agriculture news in marathi, 2200 tonnes of banana per day in Jalgaon | Agrowon

जळगावमधून प्रतिदिन २२०० टन केळीची पाठवणूक
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

जळगाव ः जिल्ह्यात कांदेबाग केळीची आवक सुरू झाली आहे. रावेर, यावलमध्ये पिलबाग व जुनारी केळीमधील कापणी जवळपास आटोपली आहे. दर्जेदार केळीला उत्तरेकडून सणासुदीमुळे मागणी असून, पंजाब, काश्‍मिर, दिल्ली व उत्तर प्रदेशात जिल्ह्यांतून प्रतिदिन किमान २२०० टन केळीची पाठवणूक सुरू आहे. कांदेबागांमधील दर्जेदार केळीचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.

जळगाव ः जिल्ह्यात कांदेबाग केळीची आवक सुरू झाली आहे. रावेर, यावलमध्ये पिलबाग व जुनारी केळीमधील कापणी जवळपास आटोपली आहे. दर्जेदार केळीला उत्तरेकडून सणासुदीमुळे मागणी असून, पंजाब, काश्‍मिर, दिल्ली व उत्तर प्रदेशात जिल्ह्यांतून प्रतिदिन किमान २२०० टन केळीची पाठवणूक सुरू आहे. कांदेबागांमधील दर्जेदार केळीचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.

केळीचे दर मागील अडीच महिन्यांपासून टिकून आहेत. मध्यंतरी कमी दर्जाच्या केळीला (वापसी) मुंबई, ठाणे, पुणे भागातूनही मागणी होती. गणेशोत्सवात मागणी चांगली होती. आता नवरात्रोत्सवानिमित्तही मागणी चांगली आहे. पिलबाग केळीची कापणी रावेरात मागील महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होती. परंतु पिलबाग केळीची कापणी जवळपास आचटोपली आहे. तर रावेरातील हिवाळ्यात लागवड केलेल्या केळीची कापणी अजून सुरू झालेली नाही.

चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर व यावलमधील काही भागातून केळी उपलब्ध होत आहे. रावेरातील सातपुडा पर्वतालगतच्या भागात केळी काही प्रमाणात कापणीसाठी उपलब्ध होत आहे. पण सर्वाधिक पुरवठा चोपडा, जळगाव भागातून होत आहे. जळगाव चोपडा भागातून ठाणे, कल्याण येथेही (लोकल) क्रेटमध्ये भरून केळी पाठविली जात आहे. तर उत्तर भारतातील मोठे खरेदीदार, केळी पिकवणी केंद्रचालक सावदा (ता. रावेर) येथील व्यापाऱ्यांकडून (एजंट) केळीची मागणी करून घेत आहेत. सावदा येथील व्यापारी चोपडा व जामनेरातून केळीची अधिकची खरेदी करीत आहेत.

उत्तरेकडे प्रतिदिन २२०० टन केळीची मागणी असल्याने पुरवठ्यासंबंधी एजन्सी चालकांनी शेतकऱ्यांकडे आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. दर्जेदार केळीला ऑनचे दर आहेत. मागील आठवड्यात चोपडा, जळगाव व जामनेर भागातून प्रतिदिन १८० ट्रक (१५ टन क्षमता) केळीचा पुरवठा झाला. तर यावल, रावेर, मुक्ताईनगरात मिळून १५० ट्रक केळीचा पुरवठा झाला. जळगावातील काही भागातून नागपूर, राजस्थान व छत्तीसगड येथे कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक झाली. पुरवठा कमी अधिक असल्याने दर्जेदार केळीसंबंधीच्या अडचणी फैजपूर (ता. यावल) व रावेरातील एजन्सी समोर येत असल्याचे सांगण्यात आले. कारण परतीचा पाऊस नसल्याने केळीच्या दर्जावरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.

भरीताच्या दर्जेदार वांग्यांचा पुरवठा कमी
जिल्ह्यात यावल तालुक्‍यातील भालोद, बामणोद, पाडळसे, न्हावी या गावांमधून भरताच्या दर्जेदार वांग्यांचा हवा तसा पुरवठा नाही. दिवाळीच्या वेळेस या भागातून वांगी उपलब्ध होतील. परंतु भुसावळमधील तळवेल, वरणगाव, पिंप्रीसेकम भागातून भरताच्या वांग्यांचा पुरवठा सुरू आहे. बाजारात त्यांना किमान १००० व कमाल २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...