पुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक

पुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक
पुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक

पुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे. परिणामी, बाजारातील भाजीपाल्याची आवकदेखील वाढत असून, रविवारी (ता. १९) गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक झाली हाेती. तर पालेभाज्यांमध्ये काेथिंबीर सुमारे २ लाख तर मेथी सुमारे ८० हजार जुड्या आवक झाली हाेती.

परराज्यांतून हाेणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ८ ट्रक कोबी, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून २२ टेंपो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून ६ टेंपो शेवगा, इंदाैर येथून सुमारे ८ टेंपो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली हाेती. स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे २ हजार गाेणी,  टॉमेटो ५ हजार क्रेटस, फ्लॉवर आणि काेबी प्रत्येकी १५ टेंपो, गवार ८ टेंपो, भेंडी १२ टेंपो, शेवगा ४ टेंपो, ढोबळी मिरची १५ टेंपो, हिरवी मिरची ८ टेंपो, मटार सुमारे ८ हजार गोणी, काकडी १५ टेंपो, कारली आणि पावटा प्रत्येकी सुमारे १० टेंपो, भुईमूग शेंग सुमारे १०० गाेणी, तर कांदा सुमारे १५० ट्रक आणि आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १००-१३०, बटाटा : १४०-१७०, लसूण : १५०-३००, आले : सातारी: ४५०-५००, भेंडी : १५०-२५०,  गवार : गावरान : २५०-३५०, सुरती : १५०-३५०, टोमॅटो : ६०-१००, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १४०-१५०, काकडी : ६०-१००, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १००-१५०, पापडी : १८०-२००, पडवळ : १४०-१५०, फ्लॉवर : ४०-६०, कोबी : ५०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : १४०-१५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १००-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : ९०-१००, शेवगा : ३००-३५०, गाजर : १२०-१६०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१२०, घेवडा : १००-२००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : २५०-३५०, पावटा : १५०-१८०, मटार : २००-२५०, तांबडा भोपळा : ५०-१५०, सुरण : २४०- २५०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २००-६००,  मेथी : ५००-८००, शेपू : ३००-६००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ४००-५०० मुळे : ५००-८०० राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-६००, पालक : ४००-६००

फळबाजार रविवारी येथील फळबाजारात मोसंबी सुमारे ६० टन, संत्री ५ टन, पपई १५ टेंपोे, लिंबे सुमारे ४ हजार गोणी, चिक्कू ५०० बॉक्स, पेरु ७०० क्रेटस्, कलिंगड २५ टेंपो, खरबुज १२ टेंपो, सिताफळ सुमारे १० टन आवक झाली हाेती. फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ७०-१६०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : ८०-१८०, (४ डझन ) : २५-८०, संत्रा : (३ डझन) १००-२५०, (४ डझन) : ४०-१२०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : १५-६०, गणेश ५-२५, आरक्ता १०-३५. कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-२५, पपई  : ५-२०, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) : २००-५००, सिताफळ : १५-१४०

फूलबाजार फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१५, गुलछडी : ४०-८०, बिजली : २०-४०, कापरी : १०-२०, शेवंती ३०-६०, ऑस्टर : ८-१४, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ५-२०, गुलछडी काडी : १०-५०, डच गुलाब (२० नग) : ४०-८०, लिलिबंडल : ८-१२, जर्बेरा : ४०-७०, कार्नेशियन : ८०-१५०, जुई २००-३००.

मटण मासळी गणेश पेठ येथील घाऊक मासळी बाजारात रविवारी (ता. १९)  खोल समुद्रातील मासळीची सुमारे ७ टन, खाडीची ४०० किलो, नदीची ३०० किलो आवक झाली हाेती. तर आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ६ टन आवक झाली हाेती, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितली. तर सध्या किनारपट्टीलगत वादळ आणि पाऊस सुरू असल्याने मासेमारी कमी झाली असून, आवक देखील घटली आहे. यामुळे विविध मासळींच्या दरात १० ते २० टक्यांनी वाढ झाली आहे.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १५००, मोठे : १५०० , मध्यम : ७५०-८००, लहान : ५५०-६५०, भिला : ४८०-५५०, हलवा : ६००, सुरमई : ४८०-५५०, मोठे ९००, रावस-लहान : ६००, मोठे  ७५०, घोळ : ५५०, करली : ३२०, भिंग : ४००, पाला : लहान ७०० मोठा १०००-११००, वाम : पिवळी लहान ३६०, मोठी ५५०, काळी : २००, ओले बोंबील : १४०-१६०, कोळंबी ः लहान १६०, मोठी : ४४० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७००, लॉबस्टर : १२००, मोरी : लहान १६०, मोठे २८०-३२०, मांदेली : १२० राणीमासा : १८०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४००, खाडीची मासळी : सौंदाळे : ३६०, खापी : ३२०, नगली : लहान २८० मोठी ४८०, तांबोशी : ४४०, पालू : ३००, लेपा :लहान १२० मोठे  २४० शेवटे : २४०  बांगडा : मोठे २००, लहान १४०,  पेडवी : ६०, बेळुंजी : १२०, तिसऱ्या : १४० खुबे :१४०. तारली : १२० नदीची मासळी : रहू : १२०, कतला : १४०, मरळ : लहान २८० मोठी ३६०-४००, शिवडा : १६० चिलापी : ५०, मागुर : १००, खवली : १६०, आम्ळी : ८० खेकडे : १६०, वाम : ४४०. मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८० कलेजी : ५२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com