तासगाव बाजार समितीत नव्या बेदाण्याला उच्चांकी २३१ दर

तासगाव बाजार समितीत नव्या बेदाण्याला उच्चांकी २३१ दर
तासगाव बाजार समितीत नव्या बेदाण्याला उच्चांकी २३१ दर

तासगाव, जि. सांगली : यावर्षीच्या नव्या बेदाण्याचे बाजारपेठेत आगमन झाले आहे. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आजच्या सौद्यांत पाच दुकानांत तब्बल दोन टन नव्या बेदाण्याची आवक झाली. हंगामातील पहिल्या बेदाण्याला तब्बल प्रतीकिलो २३१ रुपये असा उच्चांकी दर मिळाला. आज ३१ गाड्यांची आवक झाली.

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार आवारात आज नव्या बेदाण्याचे सौदे उत्साहात सुरू झाले. बेदाणा सेल हॉलमध्ये सौद्यात दत्तात्रय शिवलिंग सगरे (मांजर्डे)  यांच्या नव्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी २३१ रुपये किलो दर मिळाला.

धारेश्‍वर ॲग्रो अँड कोल्ड स्टोअरेजचे भूपाल पाटील यांच्या दुकानात सौदा झाला. रोहिणी ट्रेडिंग कंपनीचे मुन्ना मुंदडा यांनी खरेदी केला. गौरीशंकर ट्रेडिंग कंपनी, सतीश ट्रेडिंग कंपनी, बोडके ब्रदर्स आणि स्नेहल ट्रेडर्स या दुकानांत आज नव्या बेदाण्याचे सौदे झाले. या वेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मालू, अशोक बाफना, केतन सुचक, राम माळी, सुभाष हिंगमिरे, रमण अरोरा, जगन्नाथ हिंगमिरे, रितेश मजेठीया, एम. एम. पटेल, सुभाष पैलवान, सतीश माळी, राजू कुंभार, राहुल बाफना, विनायक हिंगमिरे, मुकेश पटेल, शिवरुद्र हिंगमिरे, किरण बोडके, अनुज बन्सल, रूपीन पारीख, सतोष कोष्टी आदी उपस्थित होते.

आजच्या सौद्यातत पाच टन नव्या बेदाण्याची आवक झाली. त्याला १३५ ते २३१ रुपये असा दर मिळाला. बाजारात २० हजार ५५० बॉक्‍स (३१ गाड्या) ची आवक झाली. १५ हजार ३६० (२३ गाड्या) बॉक्‍सची विक्री झाली. दरम्यान, सभापती रवींद्र पाटील व सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांनी विश्‍वासाने बेदाणा सौद्यासाठी आणण्याचे आवाहन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com