agriculture news in marathi, 233 crores for debt waiver in Satara | Agrowon

साताऱ्यात कर्जमाफीसाठी २३३ कोटी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील एक लाख ६९ हजार ४१७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्याला आजपर्यंत २३३ कोटी ६३ लाख ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले असून, यापैकी १८१ कोटी २९ लाख रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी दिली आहे.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील एक लाख ६९ हजार ४१७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्याला आजपर्यंत २३३ कोटी ६३ लाख ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले असून, यापैकी १८१ कोटी २९ लाख रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी दिली आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत थकीत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणे, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २३३ कोटी ६३ लाख ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले आहेत. यापैकी २६,२६४ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ११९ कोटी ४५ लक्ष ४५९१ रुपये रक्कम जमा करण्यात आली असून, ३९,३३८ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ६१ कोटी ८४ लाख २६ हजार ८७२ रुपये प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा करण्यात आली आहे.

उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाहीसुद्धा बॅंकांच्या माध्यमातून गतीने सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्ह्यात आतापर्यंत सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला १ लाख ५९ हजार ३०८ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २१० कोटी २२ लाख ४७ हजार २७५ आणि राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांना ३ हजार ५६५ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २३ कोटी ४० लाख ५९ हजार ६५३ रुपये, असे एकूण २३३ कोटी ६३ लाख ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले आहेत.

यापैकी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या ६२ हजार ३७ शेतकरी खातेधारकांच्या खात्यांत १५७ कोटी ८८ लाख रुपये, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांच्या ३ हजार ५६५ शेतकऱ्यांच्या खात्यांत २३ कोटी ४० लाख रुपये, अशी एकूण १८१ कोटी २९ लाख ३१ हजार ४६४ रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यांत रक्कम जमा झाली आहे.

उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्याची कार्यवाही गतीने सुरू आहे. कर्जमाफीसाठी आतापर्यंत एकूण तीन ग्रीन लिस्टनुसार रक्कम प्राप्त झाली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...