मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकर

मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकर
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकर

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी होरपळ वाढली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गाव, वाड्यांच्या संख्येत ५३ गाव वाड्यांची भर पडली आहे. २३४८ गाववाड्यांना सद्यःस्थितीत भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत अाहे. त्यांची तहान भागविण्यासाठी २३५९ टँकर धावत आहेत. त्यांच्या संख्येत गत आठवड्याच्या तुलनेत ५५ ची भर पडली असून नागरिकांचा दिवस पाण्यातच जात असल्याची स्थिती आहे. 

मराठवाड्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस होतो आहे; परंतु पावसापेक्षा गडगडाट व वादळाचाच परिणाम अधिक आहे. त्यामुळे टंचाईच्या स्थितीला काही हातभार लागेल अशी शक्‍यता नाही. दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गाव वाड्यांच्या संख्येत भरच पडत आहे. गत आठवड्यात १७०० गावे व ५९५ वाड्यांमध्ये जाणवत असलेली पाणीटंचाई चालू आठवड्यात १७३७ गावे व ६११ वाड्यांवर पोचली आहे. या टंचाईग्रस्त गाव, वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २२७७ खासगी, ८२ शासकीय अशी २३५९ टँकर सुरू आहेत. 

सर्वाधिक पाणीटंचाईचे चटके औरंगाबाद जिल्ह्याला बसत आहेत. जिल्ह्यातील ६४४ गावे, २४७ वाड्यांना ९१७ खासगी, १३ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यात ३६६ गावे, ७८ वाड्यांना २१ शासकीय व ४२१ खासगी टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. परभणीत २३ गावे व ५ वाड्यांसाठी ३७ टँकर सुरू आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील १८ गावे व ७ वाड्यांना ३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नांदेड जिल्ह्यातील ४३ गावे व १८ वाड्यांची तहान भागविण्यासाठी ४६ खासगी व ९ शासकीय टँकर धावत आहेत. औरंगाबादपाठोपाठ बीड जिल्ह्यावर जलसंकटाचे ढग अधिक गडद झाले आहेत. जिल्ह्यातील ५३३ गावे व २४६ वाड्यांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यासाठी ७१० खासगी व १४ शासकीय टॅंकर सुरू आहेत. लातूर जिल्ह्यात २५ गावे व ५ वाड्यांची तहान भागविण्यासाठी २७ खासगी व ६ शासकीय टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ९० गावे-वाड्यांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. त्यासाठी १०२ खासगी व ५ शासकीय टॅंकर आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. 

११२ विहिरींचे अधिग्रहण वाढले मराठवाड्यातील जलस्रोत झपाट्याने आटत आहेत. त्यामुळे टॅंकर व टॅंकरव्यतिरीक्‍त पाणीपुरवठ्यासाठी सातत्याने विहिरींचे अधिग्रहणही वाढविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गत आठवड्यात ३४३१ वर असलेली मराठवाड्यातील अधिग्रहित विहिरींची संख्या आजघडीला ३५४३ वर पोचली आहे. 

जिल्हानिहाय सुरू टॅंकर

औरंगाबाद  ९३०
जालना  ४४२
परभणी ३७
हिंगोली ३१
नांदेड ५५
बीड  ७२४
लातूर ३३
उस्मानाबाद  १०७

जिल्हानिहाय अधिग्रहित विहिरी

औरंगाबाद ४५९
जालना ५९१
परभणी  १८०
हिंगोली २४१
नांदेड  १०३
बीड ८७३
लातूर ४५५
उस्मानाबाद ६४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com