agriculture news in Marathi, 23729 ton grapes export to euorop, Maharashtra | Agrowon

भारतातून युरोपात २३,७२९ टन द्राक्ष निर्यात
ज्ञानेश उगले
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

द्राक्षांच्या गोडीमध्ये यंदा लक्षणीय सुधारणा झाली आहे. या स्थितीत परराज्यांतून, तसेच परदेशांतूनही उठाव वाढला आहे. येत्या काळात आवक अजून कमी होत जाणार आहे. द्राक्षांच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होणार आहे. द्राक्ष उत्पादकांनी माल देण्याची घाई करू नये. पक्व नसलेला माल काढू नये. १८ ब्रीक्‍स झाल्याशिवाय खुडा सुरू करू नये. चांगल्या गोडीच्या द्राक्षांनाच उच्चांकी दर मिळेल.
- जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना.

नाशिक : अर्लीतील द्राक्षांची वाढलेली आवक तसेच थंडीचे प्राबल्य यामुळे मागील महिनाभर द्राक्षांचे मार्केट स्थिर होते. उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झालेली असताना बागेचा द्राक्षांचा खुडा वेळेपेक्षा लवकरच आटोपत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्षाच्या परराज्यांतील बाजारपेठांतील थंडी कमी झाली आहे. याच वेळी गोड चवीची द्राक्षे बाजारात पोचत आहेत. या स्थितीत द्राक्षांना उठाव वाढला आहे. 

गत सप्ताहाच्या अखेरपर्यंत (सोमवार, ता. १२ पर्यंत) भारतातून एकूण १८१३ कंटेनरमधून २३,७२९ टन द्राक्षांची युरोपीय देशांत झाली आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत देशातून १५०३ कंटेनरमधून १९,९०८ टन द्राक्षांची निर्यात युरोपला झाली होती. ही निर्यात नेदरलॅंड (१५,५२८ टन), इंग्लंड (३८१८), जर्मनी (३०८८), बेल्जियम (७४७), डेन्मार्क (७०३) यांसह एकूण १७ देशांत झाली आहे. युरोपसह रशिया, बांगलादेश या देशांतून मागणी वाढली असून, निर्यातीचे दर येत्या काळात टिकून राहतील, असे निर्यातदार राजाराम सांगळे यांनी सांगितले.
 
द्राक्ष उत्पादक मनोज जाधव म्हणाले, की मागील आठवड्यापासूनच द्राक्षांची आवक घटण्यास व दर वधारण्यास सुरवात झाली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्‍चिम बंगाल या राज्यांतून मागणी वाढते. थंडीमुळे मागील महिन्यात द्राक्षांची मागणी स्थिर होती. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून दरात किलोमागे ५ रुपयांनी वाढ झाली. येत्या काळात दरात टप्प्याटप्प्याने वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वाधिक निर्यात नाशिक जिल्ह्यातून 
द्राक्षांची भारतातील संपूर्ण निर्यात एकट्या महाराष्ट्रातून झाली आहे. गत सप्ताहाच्या अखेरपर्यंत राज्यातून एकूण २३,७२९ टन द्राक्ष निर्यात युरोपात झाली. त्यातील सर्वाधिक निर्यात २१,३०३ टन एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली. त्यापाठोपाठ सांगली (१२१२ टन), सातारा (९२१), नगर (१७७), पुणे (१०८), सोलापूर (२४) या जिल्ह्यांतून लक्षणीय निर्यात झाली आहे.

गत सप्ताहातील देशांतर्गत बाजारातील द्राक्षांचे दर (प्रतिकिलोचे)

द्राक्ष वाण    किमान     कमाल     सरासरी
थॉमसन   ३०     ४०      ३५
सोनाका    ४०    ४५   ४०
आरके, एसएस    ५०   ७०    ६०
जम्बो, नानासाहेब पर्पल     ५०     ६०     ५५
शरद सीडलेस    ४५     ५५  ५०

गत सप्ताहातील निर्यातीच्या बाजारातील द्राक्षांचे दर (प्रतिकिलोचे)

द्राक्ष वाण     किमान   कमाल   सरासरी
थॉमसन  ६०  ८० ७५
 
   सोनाका     ४५    ५५       ५०
आरके, एसएस   ५०      ७० ६०
जम्बो, नानासाहेब पर्पल    ७०    ७७     ७५
शरद सीडलेस    ६०    ७५    ७०

  
    
    

 

इतर अॅग्रो विशेष
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...