agriculture news in marathi, | Agrowon

सोयाबीन दर उपाययोजनेसाठी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मुंबई : सध्या बाजारात सोयाबीनची आवक वाढल्याने बाजारभाव २००० ते २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी गुरुवारी (ता. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांचे भाव वाढण्यासाठी करायच्या विविध उपाययोजनांची माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. 

मुंबई : सध्या बाजारात सोयाबीनची आवक वाढल्याने बाजारभाव २००० ते २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी गुरुवारी (ता. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांचे भाव वाढण्यासाठी करायच्या विविध उपाययोजनांची माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. 

राज्यात सोयाबीनला बाजारामध्ये हमीभावपेक्षा कमी दर मिळत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोयाबीन खाद्यतेलावर १७.५% आयात शुल्क असून, ते वाढवून २७% पर्यंत करावे. क्रूड पामतेलावर १५.५% व रिफाइन पामतेलावर २५.५% आयात शुल्क असून, दोन्ही प्रकारच्या तेलावर आणखीन २०% आयात शुल्कवृद्धी करावी. सूर्यफूल खाद्यतेलावर आयात शुल्क वृद्धी करावी. सध्या सोयाबीन आयात होत असून, त्यावर बंदी आणावी. सोयाबीन व कापूस पेंडीवर (डीओसी) ५% ऐवजी १०% निर्यात इन्सेन्टिव्ह देण्यात यावा. मसूर व मटार डाळीवर आयात शुल्क वाढवण्यात यावा. आयात होणाऱ्या तेलवर्गीय व डाळवर्गीय वस्तूंच्या आयातीचा आढावा घेण्यात यावा इत्यादी उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांना या वेळी देण्यात आली.

त्याअनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने या विषयावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना मेल पाठवून दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच याविषयी त्यांच्याशी चर्चा करून बाजारातील पडलेल्या सोयाबीनच्या दरात सुधारणा करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची विनंती केली. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तातडीने योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे. या वेळी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील नादिवाडीकर व अच्युत गंगणे हे उपस्थित होते.

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...