agriculture news in Marathi, 24 crore rupees out of dated BT Cotton seed packets sezed, Maharashtra | Agrowon

मुदत संपलेली बीटी कपाशीची २४ कोटींची बियाणे पाकिटे जप्त
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

या कंपनीवर केलेल्या कारवाईत जप्त केलेले बियाण्यांचे ५२ प्रकारचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर तथ्य आढळल्यास योग्य कारवाई केली जाईल.
- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री

मुंबई ः बीटी कपाशीच्या बीजी-टू बियाण्यांच्या साठ्याप्रकरणी कृषी विभागाने केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल २४ कोटी रुपयांची २ लाख ८४ हजार रुपये किमतीची बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली.

औरंगाबाद येथील ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीवर केलेल्या या कारवाईतील बहुतांश बियाण्यांची पाकिटे ही वापराची मुदत संपून गेलेली आहेत. तसेच ज्या गोदामात हा साठा सापडला आहे, ते गोदाम नोटिफाय नसल्याचे आढळून आल्याने कंपनीने छुप्या पद्धतीने हा साठा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

यवतमाळच्या विषारी कीटकनाशकांमुळे शेतकरी मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बियाणे आणि कीटकनाशके उत्पादक कंपन्यांवर कृषी खात्याने लक्ष केंद्रित केले आहे. खात्याच्या बियाणे आणि कीटकनाशके गुणवत्ता नियंत्रण पथकाने नुकतीच औरंगाबाद येथील ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीचा बीटी कॉटन बीजी-टू बियाण्यांचा साठा जप्त केला.

१,२७९ क्विंटलचा हा साठा असून, याची किंमत सुमारे २४ कोटी रुपये इतकी आहे. २ लाख ८४ हजार पाकिटे बियाणे यात आहेत. यातली बहुतांश पाकिटे ही मुदत संपलेली असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद तालुक्यातील चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या गोदामात हा साठा ठेवण्यात आला होता, ते गोदाम नोटिफाय नसल्याचे आढळून आले आहे.

पन्यांना त्यांची उत्पादने कुठे ठेवली आहेत याची अधिकृत आणि संपूर्ण माहिती कृषी विभागाला पुरवावी लागते. मात्र, या प्रकरणात कंपनीने या गोष्टीचे उल्लंघन केल्याचे कृषी खात्याचे म्हणणे आहे. कंपनीने गोदामातील साठ्याची माहिती कृषी विभागापासून लपवून ठेवली. त्याचमुळे कृषी खात्याने कंपनीला विक्री बंदचे आदेश देत बियाण्यांच्या साठ्यासह गोदामही सील केले आहे. 

जप्त केलेल्या साठ्यातली बहुतांश पाकिटे वापराची मुदत संपून गेलेली आहेत. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर नियमानुसार विशिष्ट दर्जा कायम असलेल्या बियाण्यांना एक्सपायरीनंतरही सहा महिन्यांसाठी मुदत वाढवून मिळते. हंगामात विक्री न झालेल्या बियाण्यांच्या पाकिटांना अशी मुदत वाढवून मिळते.

जप्त केलेल्या साठ्यापैकी काही पाकिटांना मार्च २०१८ पर्यंतची वाढीव मुदत मिळाली आहे. तर काही साठ्याची मुदत वाढवून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र, मुदत वाढवून घ्यायची तर साठ्याची माहिती कृषी विभागापासून का लपवली हा मुद्दा खात्याकडून अधोरेखित केला जात आहे. 

मुदत संपून गेलेल्या साठ्यावर तारण कर्ज
कंपनीने वापराची मुदत संपून गेलेल्या बियाण्यांच्या साठ्यावर चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडून तारण कर्ज घेतले असल्याचेही पुढे आले आहे. मुदत संपून गेलेल्या साठ्यावर बँकेला असे कर्ज देता येत नाही. ही बाब कृषी खात्याकडून सहकार विभागाच्या निदर्शनाला आणून दिली जाणार आहे. त्यानुसार बँकेवरही कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 
 

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...