चोवीस जिल्ह्यांत उन्हाळी भुईमूग ग्राम बीजोत्पादन

चोवीस जिल्ह्यांत उन्हाळी भुईमूग ग्राम बीजोत्पादन
चोवीस जिल्ह्यांत उन्हाळी भुईमूग ग्राम बीजोत्पादन

परभणी : राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये येत्या उन्हाळी हंगामामध्ये भुईमुगाच्या प्रमाणित बियाणेकरिता ग्राम बीजोत्पादन योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महाबीजकडून लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी एकूण ११ हजार ५०० क्विंटल भुईमुगाचे बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. २०१८ च्या उन्हाळी हंगामामध्ये केंद्र शासनाच्या बीजोत्पादन कार्यक्रमाव्दारे फार्म सेव्हड सीड वृद्धिंगत करून शेतकरी स्तरावर बियाणे बदलाच्या दरात वाढ करण्याच्या उद्देशाने भुईमुगाच्या एसबी- ११ आणि टीएजी-२४ या वाणाच्या प्रमाणित बियाणाच्या उत्पादनासाठी राज्यातील २४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी भुईमुगाचे बियाणे ६० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि महाबीज यांच्यातर्फे तालुका निहाय गावातील लाभार्थीची निवड केली जाणार आहे. लाभार्था शेतकऱ्यांना परमीटवर त्या भागातील विक्रेत्यांकडून बियाणे पुरवठा केला जाणार आहे. बियाणे परमीट देण्यापूर्वी शेतकऱ्यांकचा सात-बारा उतारा, आधार कार्ड, सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था असल्याबाबतची खात्री केली जाणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांन बीजोत्पादन कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पीक फुलोऱ्यामध्ये असताना प्रशिक्षण घ्यावे, पिकांमधील भेसळ ओळखणे, काढणे, विलगीकरण अंतर, पिकाची काढणी, मळणी, बियाणे साठवणूक आदीचा बाबींचा आंतरभाव तांत्रिक मार्गदर्शनामध्ये करावे असे निर्देश देण्यात आले आहे. प्रतिहेक्टरी १ क्विंटल याप्रमाणे राज्यात ११ हजार ५०० हेक्टवर बीजोत्पादन घेण्यात येणार आहे. या जिल्ह्यांचा समावेश राज्यातील महाबीजच्या विविध विभागांतील एकूण २४ जिल्ह्यामध्ये भुईमुगाच्या एसबी - ११ वाणाचे ५ हजार क्विंटल आणि टीएजी-२४ वाणांचे ६ हजार ५०० क्विंटल असे एकूण ११ हजार ५०० क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये परभणी जिल्हा (१,१६७ क्विंटल), हिंगोली (१७५ क्विंटल), नांदेड (३७८ क्विंटल), लातूर (२२५ क्विंटल), उस्मानाबाद (११० क्विंटल), सोलापूर (३७७ क्विंटल), औरंगाबाद (१५५ क्विंटल), जालना (१५५ क्विंटल), नगर (३३०० क्विंटल), बीड (१८५ क्विंटल), अकोला (५५० क्विंटल), वाशीम (४०क्विंटल), बुलडाणा (२६५ क्विंटल), अमरावती (५५० क्विंटल), यवतमाळ (८२५ क्विंटल), नागपूर (५५ क्विंटल), वर्धा (२७५ क्विंटल), नाशिक (२४५ क्विंटल), धुळे (१४०० क्विंटल), नंदुरबार (७६० क्विंटल), पुणे (१३२ क्विंटल), सातारा (८८ क्विंटल), सांगली (५५ क्विंटल), कोल्हापूर (३३ क्विंटल) यांचा समावेश आहे.

. . . . . .

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com