तेलंगणमध्ये शेतीला २४ तास मोफत वीज

तेलंगणमध्ये शेतीला २४ तास मोफत वीज
तेलंगणमध्ये शेतीला २४ तास मोफत वीज

हैदराबाद, तेलंगण : चंद्रशेखर राव सरकारने तेलंगणच्या शेतकऱ्यांसाठी नूतन वर्षाची मोठी भेट दिली आहे. सोमवार (ता. १) पासून राज्यातील शेतीसाठी २४ तास मोफत वीजपुरवठा करण्याची घोषणा प्रत्यक्ष अमलात आणली आहे. याविषयी सरकारद्वारे प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ऊर्जा क्षेत्रात राज्य स्वावलंबी झाले असून, शेतकऱ्यांची विजेसंदर्भातील निराशा दूर केली आहे.

येत्या एक जानेवारीपासून शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा करण्यात येईल, अशी घोषणा तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकतीच केली होती. या घोषणेनुसार ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून २३ लाख कृषिपंपाना वीजपुरवठ्याची घोषणा राव सरकारने पूर्णत्वास आणली आहे. सरकारी माहितीनुसार राज्यात २ जून २०१४ ला ६५७३ मेगावॉट वीज क्षमता होती. ती वाढवून आजपर्यंत १४९१३ मेगावॉटपर्यंत पोचली आहे. २३ लाख कृषी उपभोक्तासहित सर्व श्रेणींना २४ तास वीजपुरवठा करण्याकरिता १२३१६ कोटींच्या गुंतवणुकींसह ट्रान्समिशन व डिस्ट्रिब्युशन सिस्टिमला मजबूत बनविले आहे.

डिसेंबरअखेर राज्यात तीन हजार मेगावॉट सौरऊर्जा निर्माण केली होती. जानेवारीत आणखी ५०० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. लिफ्ट सिंचन प्रकल्पासाठी पुरेशी वीज पुरविण्यासाठी वीज खात्याने प्रशंसनीय व्यवस्था केली आहे. वीज विभागाच्या नियोजित वेळापत्रकापेक्षाही एक महिनाआधीच काम पूर्ण होत आहे.

कृषीसह सर्व क्षेत्रांत आम्ही २४ तास वीजपुरवठा करणार आहोत. सौरऊर्जानिर्मितीमध्ये तेलंगण राज्य देशातील प्रथम क्रमांकाचे ठरले आहे. -के. चंद्रशेखर राव , मुख्यमंत्री, तेलंगण

दृष्टिक्षेपात

  • मार्चअखेरपर्यंत ११ हजार मेगावॉट ऊर्जा निर्माण करणार
  • सुरळीत वीज पुरवण्यासाठी विविध कामांना १२, ६१० कोटी
  • ५१४ नवीन सबस्टेशन, १७२४ नवीन ट्रान्स्फॉर्मस स्थापन
  • १९,१५४ किलोमीटरची पॉवर लाइन टाकण्यात आली आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com