agriculture news in marathi, 24 percent rabbi Sowing in pune devision | Agrowon

पुणे विभागात रब्बीची २४ टक्के पेरणी
संदीप नवले
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

पुणे : यंदा खरिपातील अखेरच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विभागातील शेतकऱ्यांनी आता रब्बीची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या १७ लाख ३६ हजार ४८ हेक्टरपैकी चार लाख १२ हजार ५७७ हेक्टर म्हणजेच २४ टक्के पेरणी झासल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे : यंदा खरिपातील अखेरच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विभागातील शेतकऱ्यांनी आता रब्बीची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या १७ लाख ३६ हजार ४८ हेक्टरपैकी चार लाख १२ हजार ५७७ हेक्टर म्हणजेच २४ टक्के पेरणी झासल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

चालू वर्षी खरीप हंगामातील जून, जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांशी भागात खरिपातील पिके वाया गेली आहेत. उशिराने झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, काढणीच्या अवस्थेत रोग, किडीचा झालेल्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट आल्याचे चित्र आहे; परंतु हंगामात झालेल्या पावसामुळे धरणे भरल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात लागणारी पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.

यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्याने रब्बी ज्वारीच्या पेरण्या खोळबल्या होत्या; परंतु उशिराने का होईना काही शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली आहे. त्याचबरोबर खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाकडे शेतकऱ्यांचा ओढा अधिक असल्याने हरभरा आणि गव्हाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

सध्या नगर जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन, बाजरी, मका, भूईमूग या पिकांची काढणी सुरू आहे. कापूस पिकांची बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी वेचणीचे कामे सुरू आहेत. तूर पीक फुले व शेंगा लागणेच्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी रब्बी हंगामाचे मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी वापसा आहे, तिथे पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ज्वारी, गहू, मका, हरभरा या पिकांची सरासरीच्या सहा लाख ४५ हजार ९९ हेक्टरपैकी १ लाख ८९ हजार ६२४ हेक्टर म्हणजेच २९ टक्के पेरणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात बाजरी, मका, भूईमूग, सोयाबीन या पिकांची कापणी अंतिम टप्प्यात आहे. पश्चिमेकडील पट्ट्यात भातपीक काढणीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी रोग, किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे; तर बारामती, दौंड, शिरूर, आंबेगाव, जुन्रर, हवेली या तालुक्यात रब्बी ज्वारीच्या पेरणीस सुरवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या चार लाख ४ हजार ७३ हेक्टरपैकी ८२ हजार २०६ हेक्टर म्हणजेच २० टक्के पेरणी झाली आहे.

सोलापूरमध्ये बाजरी, मका, सोयाबीन, सूर्यफूल, भूईमूग या पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या सहा लाख ८६ हजार ८७६ हेक्टरपैकी एक लाख ४० हजार ७४७ हेक्टर म्हणजेच २० टक्के पेरणी झाली आहे.

इतर बातम्या
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...