सोलापुरात अडीच लाख शेतकऱ्यांचा पीकविमा

जिल्हा बॅंकेच्या वैराग शाखेत विमा हप्ता न घेतल्याने मला ऑनलाइन सेवा केंद्रावर फॉर्मसाठी जावे लागले. त्याठिकाणी सर्व्हर डाऊनची समस्या होतीच, पण काहीसा कमी वेळ लागला. - महेश रेळेकर, शेतकरी, शेळगाव (आर), ता. बार्शी शेतकऱ्यांनी पीकविम्याचा अर्ज आणि डीडी थेट बॅंकेत जमा करावा. ही सुविधा फक्त बॅंकेतच उपलब्ध आहे. यामध्ये विमा हप्त्याची रक्कम डीडी स्वरूपात किंवा ऑनलाइन ३१ जुलैच्या तारखेलाच जमा करावी व मूळ अर्ज बॅंकेतच द्यावा. बॅंकेला हा अर्ज ऑनलाइन अपलोड करायला वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे बॅंकेतच तो दाखल होणे आवश्‍यक आहे. तशी सूचना संबंधित विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. - रवींद्र माने, कृषि उपसंचालक, कृषी विभाग, सोलापूर
सोलापुरात अडीच लाख शेतकऱ्यांचा पीकविमा
सोलापुरात अडीच लाख शेतकऱ्यांचा पीकविमा
सोलापूर : ऑनलाइन सर्व्हर डाऊनची समस्या, सात-बारा उतारा मिळण्यातील अडचणीतूनही यंदाच्या खरीप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यात शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता.३१) दुपारपर्यंत जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी प्रीमियम भरला. गतवर्षीपेक्षा यंदा २५ हजार जादा शेतकऱ्यांनी विमा उतरवला.
अलीकडच्या तीन-चार वर्षांपासून खरिपातही पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र ७९ हजार हेक्‍टर इतके निश्‍चित केले आहे; पण त्या तुलनेत आजअखेर १ लाख ६२ हजार ६६१ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीन आणि तुरीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्याशिवाय उडीद, मुगाचा समावेश आहे. सोयाबीन आणि तुरीसाठी प्रीमियम भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मंगळवारी दुपारपर्यंत अडीच लाख शेतकऱ्यांनी विमा भरला होता. गेल्यावर्षी हीच संख्या २ लाख २५ हजार होती.
विम्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे जबाबदारी आहे; पण यंदा सुरवातीपासूनच ऑनलाइन सर्व्हर डाऊन, सात-बारा उताऱ्यातील अडचणीमुळे शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी ठरली. गावात सात-बारा उतारा मिळवणे, पीकपेरा दाखला यांसारख्या कागदपत्रांसाठी तलाठ्याच्या मागे फिरण्याची वेळ आली. ऑनलाइन ई-सेवा केंद्रांनी तर शेतकऱ्यांची लूट केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com