agriculture news in marathi, 250 villages from Nanded district goes on agitation | Agrowon

नांदेड जिल्ह्यात २५० गावांत शेतकऱ्यांचा संप
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

नांदेड : पुणे जिल्ह्यातील कानगाव (ता. दौंड) येथील गावकऱ्यांनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सुरू केलेल्या बेमुदत संपाला पाठिंबा म्हणून शनिवारी (ता.18) सकाळी नऊ वाजल्यापासून नांदेड जिल्ह्यातील सुमारे २५० गावांमध्ये शेतकऱ्यांनी लाक्षणिक संप केला आहे. सरकारचा जाहीर निषेध करत अनेक ठिकाणी घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकांमध्ये सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव, वीजबिल माफी आदी मागण्यांचे ठराव घेण्यात आले.

नांदेड : पुणे जिल्ह्यातील कानगाव (ता. दौंड) येथील गावकऱ्यांनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सुरू केलेल्या बेमुदत संपाला पाठिंबा म्हणून शनिवारी (ता.18) सकाळी नऊ वाजल्यापासून नांदेड जिल्ह्यातील सुमारे २५० गावांमध्ये शेतकऱ्यांनी लाक्षणिक संप केला आहे. सरकारचा जाहीर निषेध करत अनेक ठिकाणी घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकांमध्ये सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव, वीजबिल माफी आदी मागण्यांचे ठराव घेण्यात आले.

शनिवारी (ता.18) सकाळी बाचोटी (ता. कंधार) येथे राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या उपस्थितीत शेतकरी संपास सुरवात झाली. नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, लोहा, बिलोली,अर्धापूर नांदेड आदी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी सार्वजनिक ठिकाणी एकत्र आले. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.

पुणतांबा (जि. नगर) येथील शेतकरी संपाप्रमाणे राज्य सरकारला कानगाव येथील शेतकऱ्यांचा संप मोडीत काढता येऊ नये यासाठी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या पुढाकारातून शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती, आम आदमी पार्टी, क्रांतिवीर छावा, किसान बिरादरी आदी पक्ष संघटना या लाक्षणिक संपात सहभागी झाल्या आहेत.

दरम्यान, बाचोटी आणि नंदनवन (ता. कंधार) येथील शेतकरी बैठकांमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. पीक विमा मंजूर करण्यात यावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत अनुदान देण्यात यावे आदी मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले. रविवारी (ता. १९) नांदेड जिल्ह्यातील उर्वरित गावांमध्ये तसेच हिंगोली जिल्ह्यातील गावांमध्ये संप केला जाईल, असे श्री. धोंडगे यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...
आणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...