agriculture news in marathi, 2500 crore FRP bill pending in Maharashtra | Agrowon

अडीच हजार कोटींची एफआरपी थकली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत बिलापोटी ८ हजार १५० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. साखर दरात अपेक्षित सुधारणा नसल्याने सुमारे अडीच हजार कोटींची एफआरपी थकली आहे. 

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत बिलापोटी ८ हजार १५० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. साखर दरात अपेक्षित सुधारणा नसल्याने सुमारे अडीच हजार कोटींची एफआरपी थकली आहे. 

राज्यात कायद्यानुसार यंदा साखर कारखान्यांनी साडेनऊ टक्के उताऱ्याला २५५ रुपये प्रतिक्विंटलने एफआरपी पेमेंट करायचे आहे. तसेच साडेनऊ टक्क्याच्या पुढे ०.१ टक्के दराने २.६८ रुपये अदा करणे बंधनकारक आहेत. गाळपासाठी यंदा शेतकऱ्यांनी भरपूर ऊस दिलेला असताना काही कारखान्यांचे आर्थिक नियोजन चुकल्यामुळे एफआरपीपोटी अजून अडीच हजार कोटीची शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. ऊस गाळपासाठी येणारा प्रतिटन खर्च आणि त्यापासून तयार होणाऱ्या साखरेला सध्या बाजारात असलेली किंमत यात तफावत असल्यामुळे एफआरपी थकलेली आहे, अशी माहिती साखर कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.  

साखरेचे दर कोसळलेले असतानाही आतापर्यंत राज्यातील १८३ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस खरेदीपोटी ८१५० कोटी रुपये अदा केलेले आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या हप्त्यापर्यंत ४८० लाख टनाच्या आसपास उसाचे गाळप झाले होते. 
उसाचा तोडणी व वाहतूक खर्च शेतकऱ्यांच्या पेमेंटमधूनच कापून घेतला जातो. ही कपात बघता साडेदहा हजार कोटी रुपयांचे केनपेमेंट शेतकऱ्यांना करणे अत्यावश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात पेमेंट साडेआठ हजार कोटी रुपये देखील झालेले नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  

देशाचा साखर बाजारात सध्या मंदी आहे. त्यामुळे कारखान्यांकडे हजारो टन साखर साठा पडून आहे. साखर विक्रीतून चालू हंगामात अपेक्षित पैसा कारखान्यांकडे येत नसल्यामुळे बॅंकांनी देखील साखरेवरील मूल्यांकन घडविले आहे. मूल्यांकन घटल्यामुळे शेतकऱ्यांचे पेमेंट करण्यात बहुतेक कारखान्यांसमोर समस्या तयार झाल्या आहेत. त्यामुळेच अडीच हजार कोटीची एफआरपी थकली आहे. अर्थात, क्षमता नसतानाही शेतकऱ्यांसाठी काही कारखाने एफआरपीपेक्षाही जादा रक्कम अदा करीत आहेत. राज्यात किमान ४७ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीने पूर्ण किंवा एफआरपीपेक्षाही जास्त पेमेंट केले आहे, असेही साखर कारखान्यांच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 

पुणे विभाग आघाडीवर 
‘एफआरपी थकविण्यात राज्यात पुणे विभागातील साखर कारखाने आघाडीवर आहेत. आतापर्यंत या विभागातील ६१ पैकी ४२ साखर कारखान्यांनी कमी एफआरपी दिली आहे. सहा कारखान्यांनी तर ५० टक्केदेखील एफआरपी दिलेली नाही. मात्र याच विभागातील तेरा साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षाही जादा पेमेंट केले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...