agriculture news in marathi, 2500 crores of rupee loss and help zero | Agrowon

अडीच हजार कोटींचे नुकसान अन् मदत शून्य
विनोद इंगोले
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

नागपूर ः बोंड अळीग्रस्त कापूस तसेच धान उत्पादकांना मदत जाहीर करण्यात आली. परंतु संत्रानगरीत झालेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे मुख्य पीक असलेल्या संत्रा फळाच्या नुकसानीबद्दल कोणत्याही लोकप्रतिनिधीने ब्र शब्दही काढला नाही. परिणामी संत्रा उत्पादकांना वालीच नसल्याची भावना संत्रा उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे.

नागपूर ः बोंड अळीग्रस्त कापूस तसेच धान उत्पादकांना मदत जाहीर करण्यात आली. परंतु संत्रानगरीत झालेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे मुख्य पीक असलेल्या संत्रा फळाच्या नुकसानीबद्दल कोणत्याही लोकप्रतिनिधीने ब्र शब्दही काढला नाही. परिणामी संत्रा उत्पादकांना वालीच नसल्याची भावना संत्रा उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे.

देशात नऊ लाख हेक्‍टर तर विदर्भात दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. यातील ८० ते ९० हजार हेक्‍टर क्षेत्रावरील झाडे ही उत्पादनक्षम असल्याचे राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था सांगते. विदर्भाची वार्षिक उत्पादकता आठ ते नऊ लाख टन इतकी आहे. दरम्यान या वर्षीच्या हंगामात संत्रा उत्पादकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.

मृग बहरातील संत्रा घेणाऱ्या शेतकऱ्यांना अवेळी आणि अनियमित पावसामुळे नुकसान सोसावे लागले. २८ मे २०१७ रोजी झालेल्या अवेळी पावसामुळे मृग बहराचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर वातावरणातील बदल आणि तत्सम कारणांमुळे आंबिया बहरात फळगळ झाली. आंबिया आणि मृग बहरातील संत्र्याचे ११०० कोटी रुपयांचे नुकसान एकट्या अमरावती जिल्ह्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज तज्ज्ञ वर्तवितात. अचलपूर तालुक्‍यात आंबिया बहरातील फळगळीमुळे ८५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. तर नागपूर जिल्ह्यातही संत्रा फळगळीमुळे एक हजार कोटींपेक्षा अधिकची हानी झाल्याचा अंदाज आहे.

अधिवेशनातून संत्रा हद्दपार
दरवर्षी संत्रा दर, फळगळीमुळे झालेले नुकसान असे मुद्दे संत्रानगरी अशी ओळख असलेल्या नागपुरात होणाऱ्या अधिवेशनात उचलले जातात. या वेळी मात्र विदर्भातील मंत्र्यांकडून या मुद्द्यांवर साधा ब्र शब्दही काढण्यात आला नाही, त्यामुळे संत्रा उत्पादकांमध्ये नाराजी आहे. अडीच ते तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान आंबिया आणि मृग बहरात झाल्याचा अंदाज संत्रा उत्पादक वर्तवितात. कापूस, धान उत्पादकांना दिलेल्या मदतीचे स्वागत होत असताना सरकारने आम्हालाही विचारात घ्यावे, अशी अपेक्षा संत्रा उत्पादकांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्‍त केली
आहे.

संत्रा पट्ट्यातील आमदारांनी या प्रश्‍नांवर साधलेली चुप्पी बरीच बोलकी आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना कोणी वालीच नसल्याचे सिद्ध होते. आंबिया बहरातील संत्र्याला वातावरणातील बदलाचा फटका बसत फळगळ झाली. अमरावती जिल्ह्यात तर या संदर्भाने सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. हे काम सर्वेक्षणापुरतेच मर्यादित राहिले आणि मृग बहरातील नुकसानीची दखलच घेण्यात आली नाही.
- रमेश जिचकार, मुख्य कार्यकारी अधिकारी,
श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी,  वरुड, जि. अमरावती.
अमरावतीसोबतच नागपूर, अकोला आणि वाशीम

जिल्ह्यांतदेखील संत्रा उत्पादक आहेत. परंतु अमरावती जिल्ह्यात सर्वेक्षणाचे आदेश झाले आणि उर्वरित जिल्ह्यांत यंत्रणेच्या हालचालीच नाही. एकच पीक आणि वातावरणदेखील सारखेच असताना एका जिल्ह्याला एक न्याय आणि एकाला वेगळा हे धोरणच शेतकऱ्यांच्या मुळाशी उठणारे आहे. सरकारने संत्रा उत्पादकांना दिलासा देण्याकरीता मदत जाहीर करावी.
- मनोज जवंजाळ, संत्रा उत्पादक, काटोल, जि. नागपूर.

इतर बातम्या
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
‘लॅव्हेंडर’च्या सुगंधाचे जनुकीय...कॅनगन येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्रो....
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
साताऱ्यात मेथी, कोथिंबिरीला प्रतिशेकडा...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी...सोलापूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाईवर मात...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
मराठवाड्यातील लघू, मध्यम प्रकल्पांतील...औरंगाबाद  : दुष्काळाच्या उंबरठ्यावरील...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
शास्वत उत्पन्नासाठी रेशीम उद्योग समजून...औरंगाबाद : शाश्वत उत्पादन व उत्पन्नासाठी नव्याने...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...