agriculture news in Marathi, 251 grampanchayats electricity supply, jalgaon, maharashtra | Agrowon

तब्बल २५१ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित होणार
चंद्रकांत जाधव
रविवार, 24 सप्टेंबर 2017

जळगाव : जिल्हाभरातील जवळपास २५१ ग्रापपंचायतींनी वीजबिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्‍यता आहे. महावितरण किंवा वीज कंपनीने बिले थकलेल्या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरवात केली आहे. 

या ग्रामपंचायतींकडे मिळून तीन कोटींपर्यंत थकबाकी आहे. ही थकबाकी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी किंवा कूपनलिकांच्या वीजजोडणीची आहे. ही थकबाकी भरण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व महावितरणचे अधिकारी, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची बैठक जिल्हा परिषदेत मार्च महिन्यात झाली होती.

जळगाव : जिल्हाभरातील जवळपास २५१ ग्रापपंचायतींनी वीजबिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्‍यता आहे. महावितरण किंवा वीज कंपनीने बिले थकलेल्या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरवात केली आहे. 

या ग्रामपंचायतींकडे मिळून तीन कोटींपर्यंत थकबाकी आहे. ही थकबाकी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी किंवा कूपनलिकांच्या वीजजोडणीची आहे. ही थकबाकी भरण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व महावितरणचे अधिकारी, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची बैठक जिल्हा परिषदेत मार्च महिन्यात झाली होती.

त्यात थकीत वीजबिल ही एकरकमी भरले, तर सवलत दिली जाईल. तसेच थकीत रक्कम हप्त्याच्या स्वरूपातही भरता येईल. १० हजार रुपये हप्ता प्रतिमहिना रक्कम भरायची, असा निर्णय झाला होता. परंतु संबंधित ग्रामपंचायतींनी ही रक्कम भरलीच नाही. नंतर या ग्रामपंचायतींना पुन्हा एकदा महावितरण कंपनीने नोटिसा बजावल्या होत्या. परंतु त्याची दखल या ग्रामपंचायतींनी घेतली नाही.

आता थेट वीजपुुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने हाती घेतली आहे. चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, जळगाव या तालुक्‍यांमधील ७५ ग्रामपंचायतींचा पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या कूपनलिका, विहिरी यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून थकीत विजबिले भरायची की नाहीत या संदर्भात ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यात संभ्रम आहे. त्यामुळे वीजबिले भरण्यास विलंब होत असल्याची माहिती मिळाली आहे. 

ग्रामपंचायतींचे उत्पन्न गावातील पीक स्थिती कशी आहे यावरच अवलंबून असते. पिके चांगली तर कर गोळा होतो. पण गेली काही वर्षे खरीप हाती येतो तर रब्बीत फटका बसतो. त्यामुळे कर गोळा होत नाही. कुठलीही ग्रामपंचायत जाणीवपूर्वक वीजबिल थकविणारी नसते. 
- वासुदेव पाटील, माजी सरपंच, जवखेडे, ता. एरंडोल, जि. जळगाव

 

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...