agriculture news in Marathi, 26 lac deep boar wells in India, Maharashtra | Agrowon

जमिनीच्या पोटात २६ लाख बोअरवेल !
वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

नवी दिल्ली ः देशात बोअरवेलच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून, जमिनीच्या पोटात खोलपर्यंत बोअर टाकण्याची स्पर्धाच जणू सुरू झाली आहे. अलीकडेच केंद्रीय पाणीसाठे मंत्रालयाने केलेल्या पाचव्या लहान व सूक्ष्मसिंचन गणना केली. या गणनेनुसार देशात २००६-०७ ते २०१३-१४ या काळात बोअरवेलच्या संख्येत ११ लाखांनी वाढ झाली आहे. या काळात देशात एकूण बोअरवेलची संख्या १४.६ लाखांवरून २६ लाखांवर गेली आहे आणि ही संख्या चिंताजनक आहे, अशी माहिती या लहान व सूक्ष्मसिंचन गणना अहवालातून पुढे आली आहे.

नवी दिल्ली ः देशात बोअरवेलच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून, जमिनीच्या पोटात खोलपर्यंत बोअर टाकण्याची स्पर्धाच जणू सुरू झाली आहे. अलीकडेच केंद्रीय पाणीसाठे मंत्रालयाने केलेल्या पाचव्या लहान व सूक्ष्मसिंचन गणना केली. या गणनेनुसार देशात २००६-०७ ते २०१३-१४ या काळात बोअरवेलच्या संख्येत ११ लाखांनी वाढ झाली आहे. या काळात देशात एकूण बोअरवेलची संख्या १४.६ लाखांवरून २६ लाखांवर गेली आहे आणि ही संख्या चिंताजनक आहे, अशी माहिती या लहान व सूक्ष्मसिंचन गणना अहवालातून पुढे आली आहे.

देशात सतत पडणारा दुष्काळ आणि अनियमित पडणारा पाऊस यामुळे पाणीटंचाईची भीषणता मागील काही वर्षांपासून जाणवत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने शेतकरी आता बोअरवेल मोठ्या प्रमाणात घेत आहेत. बोअरवेलच्या व्याख्येनुसार ७० मीटरपेक्षा अधीक खोल बोअर या अतिखोल समजल्या जातात. 

‘‘एकूण बोअरवेलपैकी ३८.६ टक्के या इतर मागास वर्गातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत, तर ६.७ टक्के अनुसूचित जाती आणि ४.५ टक्के या अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत. ९६.६ टक्के बोअरवेल या विजेवर चालतात, तर ३.३ टक्के डिझेलवर चालतात. बऱ्याच बोअरवेलचे पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. या सर्व बोअरवेलपैकी ८० टक्के वापरात आहेत, तर २० टक्के बोअरवेल या कमी पाण्यामुळे कमी वापरात किंवा बंद आहेत,’’ अशी माहिती अहवालातून मिळाली. 

या राज्यात जास्त बोअरवेल
या अतिखोल बोअरवेलची संख्या जास्त करून पंजाब, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, हरियाना, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामंध्ये आहे. या राज्यांमध्ये बोअरवेलच्या माध्यमातून १२.६८ दशलक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या बोअरवेलपैकी ४० टक्के बोअर या ७०-९० मीटर खोल आहेत. २६ टक्के बोअरवेल या ९० ते ११० मीटर खोल आहेत. 

१२.६८ दशलक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
देशातील ६६१ जिल्ह्यांमध्ये एकूण २६ लाख बोअरवेलच्या माध्यमातून १२.६८ दशलक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. १९८७ मध्ये १ लाख असणाऱ्या बोअरवेलच्या संख्या २०१३-१४ मध्ये बोअरवेलची २६ लाख झाली. एकूण बोअरवेलपैकी ९८.५ टक्के या खासगी मालकीच्या आहे. ८१ टक्के या शेतकऱ्यांच्या मालकीच्या तर १९ टक्के या शेतकरी गटाच्या मालकीच्या आहेत. तब्बल ५० टक्के या सीमांत आणि लहान शेतकऱ्यांच्या आहेत, अशी माहिती अहवालातून पुढे आली. 

वर्षनिहाय बोअरवेलची संख्या (लाखांत)

  १९८७   १
  २०००-१   ५
  २००६-०७   १४.५
  २०१३-१४   २६

इतर अॅग्रो विशेष
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...