सातारा जिल्ह्यात २६ टक्के पीककर्जाचे वितरण

सातारा जिल्ह्यात २६ टक्के पीककर्जाचे वितरण
सातारा जिल्ह्यात २६ टक्के पीककर्जाचे वितरण

सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १६८० कोटी रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी एप्रिलअखेर ४३७ कोटी २३ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या २६ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा बॅंकेने ४१० कोटी ७८ लाख रुपये वाटप केले आहे. रब्बी हंगामाप्रमाणेच खरीप हंगामात राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांच्या दुर्लक्ष सुरू असून, या बॅंकांनी उद्दिष्टांपैकी अवघे तीन टक्के पीककर्ज वितरण केलेले आहे.  खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १६८० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे. एप्रिलअखेर उद्दिष्टाच्या २६ टक्के वाटप झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे सातारा जिल्हा बॅंकेशी व त्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंकेशी जोडलेले आहेत.  पीककर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बॅंक आघाडीवर असून, या बॅंकेस या ८१० कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी या बॅंकेने ४१०.७८ कोटींचे वाटप केले असून, ५१ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. राष्ट्रीयकृत बॅंकाकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असून जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २१ राष्ट्रीयीकृत बॅंकाना ६७४ कोटी ७० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र या बॅंकाकडून एप्रिल अखेर २० कोटी ४९ लाख म्हणजेच उद्दिष्टांच्या अवघे तीन टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे. तसेच दहा खासगी बॅंकाना १९३ कोटी २० लाखाच्या उद्दिष्टापैकी पाच कोटी ९६ लाख रुपयांचे म्हणजेच उद्दिष्टांच्या अवघे तीन टक्के वितरण करण्यात आले आहे. टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांवर कारवाईची मागणी गत रब्बी हंगामात मार्चअखेरपर्यंत कोणत्याही बॅंकेने उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. हंगामाच्या सुरवातीस अनेक राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने पीककर्ज वाटप कमी झाले. खरिपात ज्या राष्ट्रीयकृत व खासगी बॅंकानी पीक कर्ज वितरण टाळाटाळ करत आहेत अशा बॅंकावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com