agriculture news in Marathi, 26 thousand birds register at nandur madhyameshvar bird Sanctuary, Maharashtra | Agrowon

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात २६ हजार पक्ष्यांची नोंद
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 डिसेंबर 2017

नाशिक : नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात बुधवारी (ता. २९) वन्यजीव विभाग नाशिक पक्षी मित्रमंडळ निफाड यांच्या वतीने करण्यात आलेल्या पक्षी गणनेत २६ हजारांहून अधिक पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ही पक्षी गणना करण्यात आली. यासाठी पक्षीमित्रांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते.

नाशिक : नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात बुधवारी (ता. २९) वन्यजीव विभाग नाशिक पक्षी मित्रमंडळ निफाड यांच्या वतीने करण्यात आलेल्या पक्षी गणनेत २६ हजारांहून अधिक पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ही पक्षी गणना करण्यात आली. यासाठी पक्षीमित्रांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते.

पक्षिगणनेत वन्य जीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, पक्षी मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष डॉ. उत्तम डेर्ले, पक्षिमित्र किरण बेलेकर, राहुल वटघुले, गंगाधर आघाव, अमोल दराडे, प्रमोद दराडे, शंकर लोखंडे, अमोल डोंगरे, गोडगे, तांबे, चव्हाण, पोटे आदी सहभागी झाले होते.

या वेळी देशी-विदेशी पक्ष्यांसह अनेक स्थलांतरित पक्षी येथे दिसले. विशेषत: स्पॉट बिल, ब्राह्मणी डग, व्हाइट आयबीज, मार्श हेरिअर, किंगफिशर, इंडियन रोलर, सिल्व्हर बिल, ग्रे हेरॉन, पर्पल हेरॉन, पिग्मी गुज, कॉमन टिल, जेकाना, पेंटेड स्टार्क असे नानाविध पक्षी दिसून आले.

सध्या स्थलांतरीत व स्थानिक पक्ष्यांचा हंगाम सुरू असून, पक्षी निरीक्षणासाठी येथे सुविधा उपलब्ध आहेत. वन्यजीव कर्मचारी, गाइड माहितीसाठी मदत करतात. येथे राहण्यासह जेवण व नाश्‍त्याची व्यवस्था असल्याने येथे पर्यटक गुलाबी थंडीत पक्षी निरीक्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत.

इतर अॅग्रो विशेष
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...