agriculture news in marathi, 2628 farmpond completed in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात २६२८ शेततळी पूर्ण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जानेवारी 2018

सांगली :  जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना जिल्हा कृषी विभागाने चांगली प्रभावीपणे राबिवली आहे. जिल्ह्याला ४ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी दीड वर्षात २६२८ शेततळे पूर्ण झाले असून, यासाठी ११ कोटी १९ लाख रुपये अनुदान दिले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

शाससाने मागेल त्याला शेततळे ही नवीन योजना तयार केली आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकरी प्रतिसाद देत आहेत. जिल्ह्यात ४५०० शेततळ्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २६२८ शेततळ्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

सांगली :  जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना जिल्हा कृषी विभागाने चांगली प्रभावीपणे राबिवली आहे. जिल्ह्याला ४ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी दीड वर्षात २६२८ शेततळे पूर्ण झाले असून, यासाठी ११ कोटी १९ लाख रुपये अनुदान दिले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

शाससाने मागेल त्याला शेततळे ही नवीन योजना तयार केली आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकरी प्रतिसाद देत आहेत. जिल्ह्यात ४५०० शेततळ्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २६२८ शेततळ्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

उर्वरित शेततळ्यांचे उद्दिष्ट मार्चअखेर पूर्ण केले जाणार आहे. दुष्काळी भागातील तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तालुक्‍यात पाणी प्रश्‍नाला सातत्याने सामोरे जावे लागत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेतला आहे. सर्वाधिक शेततळे तासगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी घेतले आहेत. तर कवठेमहांकाळ तालुक्‍यात ५४८ शेततळे आहेत. यामुळे पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

शिराळा तालुक्‍यात वारणा धरण असल्याने मुबलक पाणी उपलब्ध आहे. यामुळे या तालुक्‍यात केवळ ७६ शेततळी आहेत. या तालुक्‍यात शेततळ्यासाठी असणारा निधी तसाच आहे. या तालुक्‍यात ५ लाख रुपये निधी शेततळ्यासाठी राखून ठेवला आहे. जिल्ह्यात शेततळ्याचा आजमितीत १३ लाख २३ हजार निधी अजून शिल्लक आहे. शेतकरी अजूनही मागेल त्याला शेततळ्यासाठी ऑनलाइन अर्ज करत आहेत. त्यामुळे हा निधी कमी पडू नये यासाठी शासनाकडे निधीचा मागणी केली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात १८१ शेततळे पूर्ण झाली आहेत. या पूर्ण झालेल्या शेततळ्यांची माहिती ऑनलाइन प्रणालीवर भरण्याचे काम सुरू असून, त्यासाठी ७२ लाख ४० हजार रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना प्रभावीपणे राबविली जाते आहे. शेतकऱ्यांनी या योजनेला लाभ घ्यावा.
- राजेंद्र साबळे
जिल्हा कृषी अधीक्षक, सांगली.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...