agriculture news in marathi, 277 farmers suicides are ineligible for help | Agrowon

पावणेतीनशे शेतकरी आत्महत्या मदतीस अपात्र
सू्र्यकांत नेटके
शनिवार, 13 जानेवारी 2018

नगर ः सधन, बागायतदार आणि ऊस उत्पादकांचा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये १५ वर्षांत तब्बल सहाशे नऊ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. त्यातील ३१७ आत्महत्या मदतीला पात्र झाल्या असून, २७७ शेतकरी आत्महत्या सरकारी मदतीला अपात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागासोबत नगरसारख्या सधन भागातही आत्महत्या होऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी एक उपाययोजना म्हणून कर्जमाफी झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये जवळपास साठ; तर या महिन्याच्या दहा दिवसांत चार आत्महत्या झाल्या आहेत.

नगर ः सधन, बागायतदार आणि ऊस उत्पादकांचा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये १५ वर्षांत तब्बल सहाशे नऊ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. त्यातील ३१७ आत्महत्या मदतीला पात्र झाल्या असून, २७७ शेतकरी आत्महत्या सरकारी मदतीला अपात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागासोबत नगरसारख्या सधन भागातही आत्महत्या होऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी एक उपाययोजना म्हणून कर्जमाफी झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये जवळपास साठ; तर या महिन्याच्या दहा दिवसांत चार आत्महत्या झाल्या आहेत.

राज्यातील मराठवाडा, विदर्भात काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. पावसाअभावी पिके वाया जाणे, दुष्काळ, शेतमालाला पुरेसा दर न मिळणे, शेती, पाणी, मुलींचे लग्न, मुलांची शिक्षण अन्य बाबींसाठी कर्ज घेतल्यावर त्याची परतफेड होत नसल्याने शेतकरी आत्महत्या होत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे सरकारने शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमाफीसह अन्य उपाययोजना केल्या.

आतापर्यंत फक्त दुष्काळी भागात आत्महत्या होत असल्याची चर्चा होत होती. मात्र ऊस उत्पादकांचा जिल्हा असलेल्या नगरसारख्या जिल्ह्यामध्येही शेतकरी आत्महत्या होत आहेत. जिल्ह्यामध्ये २००३ पासून शेतकरी आत्महत्या झाल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. २०११ पर्यंत आत्महत्येचा आकडा मोजकाच होता, मात्र त्यानंतर आत्महत्येचा आकड्याने उड्डाण घेतले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासन मदत देते.

त्यासाठी कृषी विभाग, पोलिस आणि महसूल विभागाची त्रिस्तरीय समितीने दिलेला अहवालावर जिल्हास्तरीय समिती चर्चा करून सत्यता तपासते व मदत जाहीर करते. आतापर्यंत सुमारे ६०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. त्यातील ३१७ शेतकरी आत्महत्या मदतीला पात्र झाल्या आहेत. त्यातील २९७ शेतकरी कुटुंबाला सरकारी मदत दिली गेली असून, १५ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

सरकार शेतकरी आत्महत्या थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर तब्बल साठ शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे ही चिंतेची बाब आहे. सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे पद्ममश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे पणतू डॉ. सुजय विखे यांनी आत्महत्या केलेल्या दोन शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात पुढे केलेला आहे.

इतर बातम्या
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
म्हसवडच्या छावणीतील झोपड्यांत...म्हसवड, जि. सातारा : भीषण दुष्काळामुळे चारा व...
`बोकटेतील बंधाऱ्यात पाणी सोडा`नाशिक : येवला, मनमाड व ३८ गावे पाणीपुरवठा...
सांगलीतील प्रकल्पांत अवघा ११ टक्के...सांगली ः ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील लघु...
निवडणूक काळातही मिळणार ‘सन्मान'नागपूर  : शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये...
काटोल पोटनिवडणुकीला अंतरिम स्थगिती नागपूर : काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला मुंबई उच्च...
मातेरेवाडीत द्राक्षबाग कोसळून लाखोंचे...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
‘पोक्रा’आचारसंहितेच्या कचाट्यातनांदुरा, जि. बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात...
मराठवाड्यात २९ लाख जनता टॅंकरवर अवलंबून औरंगाबाद : मराठवाड्यातील २९ लाख ७२ हजार ५५२...
कृष्णा खोऱ्यात पाणी देण्यासाठी...कोयनानगर, जि. सातारा ः शासनाने कोयना धरणाच्या...
दिव्‍यांग मतदारांना केंद्रावर मूलभूत...पुणे ः मतदान केंद्रावर दिव्‍यांग मतदारांना (पीपल...
परभणीत कैरी प्रतिक्विंटल ३००० ते ४५००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...