agriculture news in marathi, 28 lakh quintals of sugar production in Nanded division | Agrowon

नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाअंतर्गतच्या पाच जिल्ह्यांतील ३१ साखर कारखान्यांनी सोमवार (ता. १०) पर्यंत २९ लाख ७८४ टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ९.६७ टक्के साखर उताऱ्याने एकूण २८ लाख ५ हजार ३९० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.

नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील एकूण ३५ पैकी १४ सहकारी आणि १७ खासगी असे एकूण ३१ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले आहे.

नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाअंतर्गतच्या पाच जिल्ह्यांतील ३१ साखर कारखान्यांनी सोमवार (ता. १०) पर्यंत २९ लाख ७८४ टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ९.६७ टक्के साखर उताऱ्याने एकूण २८ लाख ५ हजार ३९० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.

नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील एकूण ३५ पैकी १४ सहकारी आणि १७ खासगी असे एकूण ३१ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील पाच खासगी साखर कारखान्यांनी ४ लाख ९६ हजार २९५ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ४ लाख ९६ हजार ५६० क्विंटल साखर उत्पादन झाले असून १०.०१ टक्के उतारा आला आहे. गंगाखेड शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक १०.६५ टक्के आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ४ सहकारी साखर कारखान्यांनी २ लाख ७० हजार ९५० टन उसाचे गाळप केले आहे. एकूण २ लाख ६९ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन घेतले असून सरासरी ९.९४ टक्के उतारा आला आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक १०.२९ टक्के आला आहे. 

नांदेड जिल्ह्यातील ३ सहकारी आणि २ खासगी असे एकूण ५ साखर कारखान्यांनी १ लाख ९४ हजार ७५५ टन ऊस गाळप केला आहे. एकूण १ लाख ७९ हजार ७० क्विंटल साखर उत्पादन घेतेल असून सरासरी ९.१९ टक्के साखर उतारा आला आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ९.८६ टक्के आला आहे.

लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी आणि ४ खासगी असे एकूण ८ साखर कारखान्यांनी ८ लाख २९ हजार ७० टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ८ लाख २९ हजार ४० क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले असून सरासरी १० टक्के उतारा आला आहे.

मांजरा साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक १०.६४ टक्के आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ सहकारी आणि ६ खासगी साखर कारखान्यांनी मिळून ९ कारखान्यांनी एकूण ११ लाख ९ हजार ७१४ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण १० लाख ३१ हजार ५२० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून सरासरी ९.३ टक्के साखर उतारा आला आहे. नॅचरल शुगर्स कारखान्याचा उतारा सर्वाधिक १०.४३ टक्के आला आहे.

नांदेड विभागाचे ऊस गाळप टनामध्ये, साखर उत्पादन क्विंटलमध्ये
जिल्हा ऊस गाळप साखर उत्पादन साखर उतारा
परभणी ४९६२९५ ४९६५६० १०.०१
हिंगोली २७०९५० २६९२०० ९.९४
नांदेड १९४७५५ १७९०७० ९.१९
लातूर ८२९०७० ८२९०४० १०.०
उस्मानाबाद १०९७१४ १०३१५२० ९.३०

 

इतर ताज्या घडामोडी
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...