मराठवाड्यात २९ लाख जनता टॅंकरवर अवलंबून 

मराठवाड्यात २९ लाख जनता टॅंकरवर अवलंबून 
मराठवाड्यात २९ लाख जनता टॅंकरवर अवलंबून 

औरंगाबाद : मराठवाड्यातील २९ लाख ७२ हजार ५५२ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. मराठवाड्यात चार दिवसांपूर्वी १७९६ वर असलेली टॅंकरची संख्या १९ मार्चअखेर १८४६ वर पोचली आहे. चार दिवसांत टंचाईग्रस्तांमध्ये २९ गावे व १० वाड्यांची भर पडली आहे. 

टॅंकरवाडा होण्याच्या दिशेने मराठवाड्याची गतीने वाटचाल सुरू आहे. १४ मार्चला १७९६ असलेली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील टॅंकरची संख्या १९ मार्चअखेर १८४६ वर पोचली आहे. जवळपास ५० टॅंकर चार दिवसांपूर्वीच्या तुलनेत वाढले. १३६८ गाव व ४८१ वाड्यांना सद्यःस्थितीत पाणीटंचाईची झळ बसत असून, २५७२ विहिरींचे टंचाई निवारण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. 

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात यंदा टंचाईच्या झळा सर्वाधिक तीव्र आहेत. जिल्ह्यातील ५७६ गावे व २२५ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गाव, वाड्यांमधील सुमारे १२ लाख ८२ हजार लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. बीड जिल्ह्यातील ४३४ गावे व १८७ वाड्यांमधील ८ लाख ४९ हजार लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, बीड जिल्ह्यात ५७० टॅंकर पाणीटंचाई निवारण्यासाठी सुरू आहेत. जळपास ६९१ विहिरींचेही पाणीटंचाई निवारण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ५१ गावांमधील १ लाख ५९ हजार ७६२ लोकांना पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. या लोकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने ६८ टॅंकरची व ४६१ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जालना जिल्ह्यातील २५० गाव व ४९ वाड्यांमधील ५ लाख ४६ हजार लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. त्यासाठी ३०४ टॅंकर सुरू करण्यात आले असून, ४१६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

परभणी जिल्ह्यातील ६ टंचाईग्रस्त गावांमधील ११ हजार ६३५ लोकांची तहान भागविण्यासाठी ६ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. हिंगाली जिल्ह्यातील ११ गाव व २ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्या झळा निवारण्यासाठी २० टॅंकरची सोय करण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यातील १३४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील ३४ गावं व १८ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी ४२ टॅंकरची सोय केली असून, ९२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील ५ गावांतील १८०२६ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. त्यासाठी ६ टॅंकरची सोय करण्यात आली असून, जिल्ह्यातील २३९ विहिरींचे पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com