मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडे
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडे

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. २७ मध्यम प्रकल्पांमध्येही पाण्याचा थेंब नाही, तर ३३९ लघुमध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ४८ लघू व ९ मध्यम प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. २५ लघू व ५ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जालना जिल्ह्यात ४७ लघू व ३ मध्यम प्रकल्पांत पाणीच नाही. ७  लघू आणि ४ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. बीड जिल्ह्यातील ९ मध्यम व तब्बल ८० लघुप्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे ३४ लघू व ५ मध्यम प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे. 

लातूर जिल्ह्यातील ३४ लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असून एका मध्यम प्रकल्पातही पाण्याचा थेंब नाही. ७७ लघू व ३ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ८३ लघु प्रकल्पांसह ५ मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. ८६ लघु आणि ६ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठाही जोत्याखाली गेला आहे. नांदेड जिल्ह्यातील ३ मध्यम व ४८ लघुप्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. 

परभणी जिल्ह्यातील १६ लघुप्रकल्प व २ मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील १८ लघुप्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. मराठवाड्यातील तेरणा, मांजरा व रेणा नदीवरील बंधारे कोरडेठाक पडले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या भागातही दुष्काळाचे चटके बसत आहेत. 

आठ मोठ्या प्रकल्पांत नाही उपयुक्‍त पाण्याचा थेंब  मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी आठ मोठ्या प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न दुधना, सिनाकोळेगाव या प्रकल्पांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मध्यम, लघु व मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नसने मराठवाड्यात यंदा पडलेल्या दुष्काळाची तिव्रता अधोरेखीत करीत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com