agriculture news in marathi, 30 crore crop loan disburse in two days in yavatmal district | Agrowon

यवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज वाटप
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जवाटप केले जावे, यासाठी बैठका घेतल्या. कर्जवाटप मेळावे झाले. लोकप्रतिनिधींनी सूचना केल्या. परंतु, त्याचा राष्ट्रीयीकृत बॅंकांवर परिणाम झाला नाही. बॅंका सहकार्य करीत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी खातेच बंद केले. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंका वठणीवर आल्या असून दोन दिवसांत सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ३० कोटींचे कर्ज वाटप केले आहे.

यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जवाटप केले जावे, यासाठी बैठका घेतल्या. कर्जवाटप मेळावे झाले. लोकप्रतिनिधींनी सूचना केल्या. परंतु, त्याचा राष्ट्रीयीकृत बॅंकांवर परिणाम झाला नाही. बॅंका सहकार्य करीत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी खातेच बंद केले. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंका वठणीवर आल्या असून दोन दिवसांत सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ३० कोटींचे कर्ज वाटप केले आहे.

दरम्यान, शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशीदेखील कर्जवाटपासाठी ‘एसबीआय’ने ३५ शाखा सुरू ठेवल्या. 
शेतकऱ्यांना पीककर्जासाठी बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. कर्जवाटपाची संथगती पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 'एसबीआय'मधील सहा खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईनंतर राष्ट्रीयीकृत बॅंकांना जाग आली. त्यांनी दोन दिवसांत तब्बल ३० कोटींचे पीककर्ज वाटप केले. पीककर्ज वाटपासाठी शनिवार व रविवार या सार्वजनिक सुटीच्या दिवशी बॅंका सुरू ठेवण्याचा निर्णय स्टेट बॅंकेने घेतला आहे. 

गेल्या दोन महिन्यांत एसबीआयने केवळ ५१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर दोन दिवसांत तब्बल १० कोटी रुपये वाटप केले आहे.

एसबीआयचे कर्जवाटप

एसबीआय शाखा ४२
पीककर्ज वाटप ३५ शाखांमधून
ऑन ड्यूटी कर्मचारी ८०
एकूण कर्जवाटप ६१ कोटी
दोन दिवसांतील वितरण १० कोटी

 

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...