agriculture news in marathi, 30 crores fund for irrigation | Agrowon

कालवा अस्तरीकरणाला तीस कोटींचा निधी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

सांगली : म्हैसाळ  उपसा सिंचन योजनेच्या कळंबी कालवा आणि कवठेमहांकाळ कालव्याच्या   उर्वरित अस्तरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सन २०१४-१५ मध्ये या कामाला मंजुरी मिळाली होती, मात्र निधी उपलब्ध नव्हता. आता तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या हंगामापर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

सांगली : म्हैसाळ  उपसा सिंचन योजनेच्या कळंबी कालवा आणि कवठेमहांकाळ कालव्याच्या   उर्वरित अस्तरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सन २०१४-१५ मध्ये या कामाला मंजुरी मिळाली होती, मात्र निधी उपलब्ध नव्हता. आता तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या हंगामापर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनत मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि तासगाव हे तालुके समाविष्ट आहेत. अनेक ठिकाणी म्हैसाळ योजनेच्या बहुतांश कालव्यांचे अस्तरीकरण झाले आहे, मात्र काही मुख्य कालवे आणि पोटपाट केवळ खोदून सोडलेले आहेत. त्याच्या अस्तरीकरणाचे मोठे काम बाकी आहे. याशिवाय, काही कालव्यांमध्ये गळती मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी निधीची गरज होती, तो उपलब्ध नसल्याने केवळ कामांना मंजुरी देऊन प्रतीक्षा केली जात होती. या योजनेच्या विस्तारित कामाला मंजुरी मिळाल्यानंतर आता निधीचीही उपलब्धता झाली आहे. त्यातून कळंबी कालव्यासाठी १२ कोटी आणि कवठेमहांकाळ कालव्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

याशिवाय, गळती काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात आरग कालवा, सलगरे कालवा, बेडग कालव्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आरग कालव्यासाठी ५ कोटी, बेडग कालव्यासाठी २.५ कोटी, तर सलगरे कालव्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

इतर बातम्या
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
कारंजा रमजानपूर प्रकल्पास सुधारित...मुंबई : अकोला जिल्ह्याच्या खारपाण पट्ट्यातील...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
आढळा परिसरात दुष्काळी स्थितीअकोले, जि. नगर : नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत...
इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य देण्याची गरज...अकलूज, जि. सोलापूर : चालू वर्षी देशात साखरेचे...
धुळे, जळगाव जिल्ह्यात गटशेती योजनेला...जळगाव : गटशेतीला प्रोत्साहन देण्यासंबंधीच्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊसपुणे ः दीर्घकालीन खंडानंतर पावसाने पुन्हा सुरवात...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
‘एमएसपी’ साखरेलाही पाहिजे ः दिलीपराव...लातूर ः उसाला, दुधाला, शेतमालाला हमी भाव मिळावा...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
जलसंधारण कामांसाठी तालुकानिहाय कार्यशाळावाशीम : जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...