राज्यात ३० लाख शेतकरी पीकविमा कक्षेच्या बाहेर

राज्यात ३० लाख शेतकरी पीकविमा कक्षेच्या बाहेर
राज्यात ३० लाख शेतकरी पीकविमा कक्षेच्या बाहेर

पुणे:  प्रधानमंत्री पीकविमा योजनेत किमान अजून ३० लाख शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरलेला नाही. आतापर्यंत अंदाजे ५० लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. मात्र, उर्वरित बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज दाखल करावेत, असे कृषी विमा सूत्रांचे म्हणणे आहे.  ऑनलाइन विमा अर्ज दाखल करण्यात बीड जिल्ह्यातील शेतकरी आघाडीवर आहेत. बीडमध्ये आतापर्यंत ९.५० लाख शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असून नांदेडमध्ये ९ लाख, जालन्यात ५.५० लाख, उस्मानाबादेत ५.२१ लाख, परभणीत ३.४५ लाख तर औरंगाबाद जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. हिंगोलीत १.६५ लाख, बुलढाणा १.६३ लाख, सोलापूर १.१९ लाख, यवतमाळ १.७० लाख, नगर १.०९ लाख, वाशिम ८८ हजार, अकोला ८१ हजार, लातूर ६७ हजार, अमरावती जिल्ह्यात २५ हजार शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. 

पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागात शेतकऱ्यांकडून कमी अर्ज दाखल झालेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अवघे ६७, सिंधुदुर्ग २००, रत्नागिरी ५००, गडचिरोली १२००, नंदुरबार १४००, जळगाव २४००, रायगड २६००, धुळे ३०००, भंडारा ३७००, नाशिक ४१००, ठाणे ४३००, गोंदिया ५०००, सातारा ५१०० तर नागपूर जिल्ह्यात ६५०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन विमा अर्ज भरले आहेत.  

‘‘सेतू कार्यालयाची मदत न घेता स्वतः विमा अर्ज दाखल करण्यात काही भागांत शेतकऱ्यांचा पुढाकार आहे. अजून पाच शिल्लक असल्यामुळे किमान ३० लाख अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी असल्यातरी काम मात्र कोणत्याही जिल्ह्यात ठप्प नाही,’’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

शेतकऱ्यांना ३१ जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत विमा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. त्यासाठी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात (डिजिटल सेवा केंद्र) जावे लागेल. शेतकऱ्यांना कोणतीही समस्या असल्यास विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com