agriculture news in Marathi, 30 percent crop loan disbursement in Buldana District, Maharashtra | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात केवळ ३० टक्के पीक कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

बुलडाणा ः कमी पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनीही उभे केले नाही. या हंगामात बुलडाणा जिल्ह्यात अवघे  ३०.११ टक्के पीककर्ज वाटप झाले असून, ७० टक्के शेतकरी वंचित राहिले अाहेत. १७४५ कोटींचे उद्दिष्ट असलेल्या या जिल्ह्यात केवळ ५२५ कोटी रुपयांचेच वाटप बँकांनी केले अाहे.

बुलडाणा ः कमी पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनीही उभे केले नाही. या हंगामात बुलडाणा जिल्ह्यात अवघे  ३०.११ टक्के पीककर्ज वाटप झाले असून, ७० टक्के शेतकरी वंचित राहिले अाहेत. १७४५ कोटींचे उद्दिष्ट असलेल्या या जिल्ह्यात केवळ ५२५ कोटी रुपयांचेच वाटप बँकांनी केले अाहे.

खरिप हंगामासाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत पीककर्जाची एकूण रक्कम वाढवून सुमारे १७४५ कोटी करण्यात अाली होती. एप्रिलपासून पीककर्ज वाटपाला सुरवात झाल्यानंतर सहा महिन्यांत म्हणजेच ३० सप्टेंबर अखेरचा अाढावा घेतला असता सर्व बँकांमिळून ५२५ कोटींचे पीककर्ज वितरीत झाले. काही बँकांची पीककर्ज वाटपात अत्यंत निराशाजनक कामगिरी अाहे. अलाहाबाद बँकेला १०९७  खातेदारांना पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट दिलेले असताना केवळ १४ शेतकऱ्यांना या बँकेने पीककर्ज दिले.

अांंध्र बँकेनेही २० जणांना पीककर्ज देत उद्दिष्टाच्या अवघी दोन टक्क्यांपर्यंत धाव घेतली. कॅनरा बँकेने ३२९२ शेतकऱ्यांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १०३ शेतकऱ्यांना पीककर्ज देत केवळ २.३१ टक्के उद्दीष्टपूर्ती केली. पंजाब नॅशनल बँक, देना बँक, युको बँक, या बँकांची कामगिरी पाच टक्केही पीककर्ज वाटपापर्यंत पोचू शकलेली नाही. बँक अाॅफ इंडियाने २३.७६ टक्के, बँक अाॅफ महाराष्ट्रने २७.०१ टक्के, सेंट्रल बँकेने ४०.६५ टक्के, स्टेट बँक अाॅफ इंडियाने ४३.०३ टक्के पीककर्ज वाटप केले अाहे.  

बुलडाणा जिल्हा हा मागील पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळाला सामोरा जात अाहे. याही हंगामात कमी पावसामुळे दुष्काळाचे संकट अोढवले अाहे. खरीप मूग, उडीद, सोयाबीन पिकांची उत्पादकता ४० ते ६० टक्क्यांपर्यंत खाली अाहे. परतीचा पाऊसही न झाल्याने रब्बी लागवडीवर विपरित परिणाम होण्याची चिन्हे तयार झाली अाहेत.         

बँकांनी पीककर्ज वाटपाला गती द्यावी यासाठी सातत्याने बैठका झाल्या होत्या. पंरतु तांत्रिक अडचणी पुढे करीत शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारण्यात अाल्याचेच या वाटपाने शिक्कामोर्तब केले अाहे. खरीपात पीककर्ज न मिळणे, पिकांची उत्पादकता घटण्यासोबतच अाता रब्बी लागवडीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले अाहे. एकूणच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर दिवसेंदिवस अडचणीत वाढत चालल्या अाहेत.    

पीककर्जवाटपाची स्थिती
खातेदार शेतकरी - ३२८६६५
पीककर्ज उद्दीष्ट -१७४५
कर्ज मिळालेले शेतकरी-७४०६५
वाटप कर्जाची रक्कम-५२५कोटी
टक्केवारी -३०.११

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...