agriculture news in marathi, 30 thousand quintal soyabean per day arrival in latur Market committee, Maharashtra | Agrowon

लातूरला ३० हजार क्विंटल सोयाबीनची आवक
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. ही आवक तीस हजार क्विंटलची आहे. सोयाबीनसाठी शासनाचा हमीभाव क्विंटलला तीन हजार ५० रुपये आहे. असे असताना येथील बाजारात मात्र सर्वसाधारणपणे दोन हजार पाचशे रुपये या दराने सोयाबीनची खरेदी केली जाते. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. ही आवक तीस हजार क्विंटलची आहे. सोयाबीनसाठी शासनाचा हमीभाव क्विंटलला तीन हजार ५० रुपये आहे. असे असताना येथील बाजारात मात्र सर्वसाधारणपणे दोन हजार पाचशे रुपये या दराने सोयाबीनची खरेदी केली जाते. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. खऱीप हंगामात सुरवातीच्या काळात कमी पाऊस झाला; पण नंतर मात्र चांगला पाऊस झाल्याने या वर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात तीन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. पाऊस चांगला झाल्याने सोयाबीनला उताराही चांगला आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनचे भाव पडलेलेच होते. 

त्यामुळे शेतकऱ्य़ांनी बाजारात सोयाबीन आणले नाही. त्यात दिवाळीत पाच सहा दिवस अडत बाजार बंदच राहिला. सोमवारी हा बाजार सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या अडत बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट यार्डात सोयाबीनने भरलेल्या वाहनांची गर्दी दिसून येत आहे. मंगळवारी या बाजारात सोयाबीनची तीस हजार क्विंटलची आवक राहिली आहे. यात जास्तीचा भाव दोन हजार ८२५ रुपये होता. तर कमी भाव दोन हजार ४०० रुपये राहिला.

सर्वसाधारण भाव हा दोन हजार ६६० रुपये प्रतिक्विंटलला आहे. शासनाने सोयाबीनसाठी तीन हजार ५० रुपये प्रतिक्विंटलला हमीभाव जाहीर केला आहे; पण हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची व्यापाऱ्य़ांकडून खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

 

इतर अॅग्रोमनी
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...
नेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
रब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...
सुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...
मका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...
रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
नियोजन, काटेकोर अंमलबजावणीतून साधला...शेतीतील वाढता खर्च ही शेतकऱ्यांसमोरची मुख्य...
हळद, मका, कापूस मागणीत वाढीचा कलएप्रिल महिन्यात हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे...
पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणारकोल्हापूर : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे...
कौशल्य विकासातून संपत्तीनिर्माणशेती-उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण ...
मिरज बाजारात जनावरांचे दर घटले सांगली ः चारा महागलाय, पाणी नाय, केवळ...
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी लिंबाचा आधारउन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. यंदाच्या...
कापूस, मक्याच्या मागणीत वाढ सध्या बाजारपेठेत मका, हळदीच्या मागणीत वाढ आहे....
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...