agriculture news in Marathi, 30 ton hapus mango export from Ratnagiri, Maharashtra | Agrowon

तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 मे 2019

स्थानिक बागायतदारांनी निर्यातदार व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने पणन मंडळाकडून सेवा दिल्या जात आहेत. रत्नागिरीतून निर्यातीचे प्रमाण वाढत आहे.
- मिलिंद जोशी, अधिकारी, पणन मंडळ
 

रत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून इंग्लंड, कॅनडा, दुबईसह अमेरिकेला तीस टन हापूसची निर्यात आतापर्यंत करण्यात यश आले आहे. सध्या पणन मंडळाचे हे प्रक्रिया केंद्र निर्यातदाराला चालविण्यास देण्यात आले आहे. हंगाम संपेपर्यंत या केंद्रातून शंभर टनापर्यंत निर्यातीचे लक्ष्य पणन मंडळाने ठेवले आहे.

प्राथमिक प्रक्रिया करून फळाची हाताळणी करण्यासाठी पणन मंडळाने रत्नागिरीत आंबा प्रक्रिया केंद्र सुरू केले होते; मात्र त्याला प्रतिसाद कमी मिळत होता. गतवर्षी अवघा दहा टन आंबाच निर्यात करता आला. यावर्षी खासगी निर्यातदारामार्फत हे प्रक्रिया केंद्र चालविण्यास सुरवात केली आहे. या केंद्रामध्ये आलेल्या आंब्याची तपासणी करून ग्रेडिंग केले जाते. त्यानंतर त्या-त्या देशाला आवश्यक त्या प्रक्रिया त्यावर होतात. 

अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला आंबा पाठविताना विकिरण प्रक्रिया (रेडिएशन) अत्यावश्यक असते. त्यासाठी आंबा वाशीला पाठविण्यात येतो. तत्पूर्वी रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रात तो ४८ डिग्री सेल्सिअसला तीन मिनिटे ठेवून त्यावर हॉट वॉटर ट्रीटमेंट केली जाते. त्यातून बाहेर काढल्यावर आंबा ब्रशिंग, वॉशिंग, ड्रायिंगमधून काढला जातो. पुढे त्याचे अंतिम ग्रेडिंग करून पॅकिंग केले जाते. ही प्रक्रिया झाल्यानंतर विकिरण प्रक्रियेसाठी वाशीत पाठविण्यात येतो. वाशीतून पुढील सफर हवाईमार्गे सुरू होते. ही सेवा संबंधित निर्यातदारांमार्फतच होते.

प्रसन्न पेठे, मनोज काणे यांसारख्या बागायतदारांकडून अमेरिका, ऑस्ट्रेलियाला आंबा पाठविण्यात आला आहे. दुबई, कॅनडासाठी अन्य देशांप्रमाणे कोणतीही प्रक्रिया करावी लागत नाही; मात्र आंब्यावर कीटकनाशकांचा प्रादुर्भाव राहू नये, यासाठी प्राथमिक प्रक्रिया केल्या जातात. तसेच वॉशिंग, ब्रशिंग आणि ग्रेडिंग याच प्रक्रिया केंद्रात केले जाते. नुकतेच रत्नागिरीतून दुबईला १५ टन आंबा पाठविण्यात आला. या केंद्रातून स्थानिक शेतकऱ्यांकडून आलेला आंबाही पिकवून दिला    जातो. आतापर्यंत १०९ टन आंबा पिकवून दिला आहे. त्यासाठी एका पेटीस पन्नास रुपये दर आकारला जातो.

प्रक्रिया केंद्रातील सेवेचे दर असे

  • तीन किलोचा बॉक्स ने-आणसाठी दीड रुपये
  • ग्रेडिंगसाठी तीन ३ रुपये बॉक्सला
  • हॉट वॉटरसाठी तीन किलोच्या बॉक्सला २५ रुपये
  • आंब्यासाठीचे फोम नेट प्रतिनग १ रुपया
  •  कामगार वापरासाठी बॉक्सला २० रुपये
  • बॉक्स हाताळणीसाठी २ रुपये

आतापर्यंत निर्यात झालेला आंबा

  • दुबईला १५ टन
  • युरोपला ३ टन ६०० किलो
  • अमेरिकेला ३ टन ५०० किलो
  • कॅनडाला ८ टन 

इतर बातम्या
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...