agriculture news in marathi, 300 crore sanction for drought hit district, Maharashtra | Agrowon

दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी ३०० कोटींचा निधी मंजूर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त दुष्काळी जिल्ह्यांसाठी वरदान ठरणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या ३०० कोटींच्या वार्षिक कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. 

मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त दुष्काळी जिल्ह्यांसाठी वरदान ठरणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या ३०० कोटींच्या वार्षिक कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. 

मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळग्रस्त विभागावर राज्य शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जागतिक बॅंकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची (पूर्वीचे नाव हवामान अनुकूल कृषी प्रकल्प) सुरवात या विभागातील गावांसाठी करण्यात आली आहे. योजनेंतर्गत दुष्काळी मराठवाड्यातील आणि विदर्भातील क्षारयुक्त जमीन असणाऱ्या गावांमध्ये शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी आणि गावातील जमिनीचे मृद संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

या प्रकल्पाची १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांत पुढील ६ वर्षे कालावधीत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेसाठी चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जागतिक बॅंक आणि राज्य सरकार संयुक्तपणे हा खर्च करणार आहे. जागतिक बॅंकेकडून २,८०० कोटी रुपयांचे कर्ज अल्प व्याजदरावर उपलब्ध होणार आहे, तर राज्य सरकार १,२०० कोटी रुपये स्वनिधीतून देणार आहे. 
चालू वर्षासाठी या योजनेकरिता एकूण ३०० कोटींचा वार्षिक कृती आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे.

या आराखड्यास राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार चालू वर्षासाठी १,२२३ गावांमध्ये प्रकल्पांतर्गत विविध बाबींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे; तसेच पुढील वर्षी हाती घ्यायच्या कामांचे नियोजन करण्यात येणार असून, त्यासाठी ३०० कोटींचा कार्यक्रम राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय कृषी खात्याने प्रसिद्ध केला आहे.

प्रकल्पाची उद्दिष्टे 

  • हवामान बदलास अनुसरून कृषीपद्धती विकसित करणे
  •  अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वाढ करणे
  •  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी मूल्य साखळीमध्ये त्याचा सहभाग वाढविणे
  •  राज्यातील अवर्षणग्रस्त व खारपाणपट्टा जमिनी असलेल्या जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत प्रकल्प राबविणार

 

इतर अॅग्रो विशेष
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...
शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी...पुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या...
शेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार... मुंबई : शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा...
सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार कोटी :...नवी दिल्ली ः देशातील सिंचन प्रकल्पांचा विकास...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६...
अविरत कष्टातून सिंचन, अर्थकारणाला दिले...जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व...
शेतकऱ्यांकडून घेतलेल्याच दुधाची भुकटी...जळगाव ः राज्यात प्रतिदिन सहकारी व इतर प्रमुख दूध...