परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के पदे रिक्त

रिक्त पदांमध्ये वर्ग दोन संवर्गातील १०, वर्ग दोन कनिष्ठ संवर्गातील २०, वर्ग तीन संवर्गातील १३८ आणि वर्ग चार संवर्गातील २९ पदे मिळून एकूण १९७ पदांचा समावेश आहे.
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के पदे रिक्त

परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील ६४० पैकी १९७ पदे, म्हणजेच ३१ टक्के पदे रिक्त आहेत. एकूण ९ पैकी ७ तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अतिरिक्त पदभारामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामांचा ताण वाढला आहे. रिक्त पदांमुळे जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांची अमंलबजावणी व्यवस्थित होत नसल्यामुळे शेतकरी तसेच शेतीच्या विकासाला खीळ बसली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत सर्व एक ते चार संवर्गातील मिळून एकूण ६४० पदे मंजूर आहेत. रिक्त पदांमध्ये परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम या सात ठिकाणच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. गंगाखेड आणि पूर्णा या दोन तालुक्यांसाठी पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी आहेत. गंगाखेड येथील तालुका कृषी अधिकारी जी. ए. कोरेवाड यांच्याकडे जिंतूर येथील, तर पूर्णा येथील तालुका कृषी अधिकारी आर. पी. देशपांडे यांच्याकडे सोनपेठ येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांचा अतिरिक्त पदभार आहे. परभणी येथील तंत्र अधिकाऱ्यांकडे सेलू येथील तालुका कृषी अधिकारी पदांचा अतिरिक्त पदभार आहे, तर परभणी, मानवत, पाथरी, पालम येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांचा पदभार मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांच्याकडे आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तसेच उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त आहेत. कृषी अधिकाऱ्यांची ८ आणि मंडळ कृषी अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त आहेत. कृषी सहायकांची ६९ पदे, तसेच कृषी पर्यवेक्षकांची एकूण ८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये वर्ग दोन संवर्गातील १०, वर्ग दोन कनिष्ठ संवर्गातील २०, वर्ग तीन संवर्गातील १३८ आणि वर्ग चार संवर्गातील २९ पदे मिळून एकूण १९७ पदांचा समावेश आहे. अतिरिक्त पदभार असलेल्या तालुका कृषी अधिकारी यांच्यापासून ते कृषी सहायकांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. कृषी विभागाच्या योजनांच्या व्यवस्थित अमंलबजवणीसाठी, तसेच त्या शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोचवण्यासाठी अनेक वर्षांपासून रिक्त असेलली पदे तत्काळ भरण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com