agriculture news in Marathi, 31 percent posts are vacant in agricultural department in parbhani district, Maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के पदे रिक्त
माणिक रासवे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

रिक्त पदांमध्ये वर्ग दोन संवर्गातील १०, वर्ग दोन कनिष्ठ संवर्गातील २०, वर्ग तीन संवर्गातील १३८ आणि वर्ग चार संवर्गातील २९ पदे मिळून एकूण १९७ पदांचा समावेश आहे.

परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील ६४० पैकी १९७ पदे, म्हणजेच ३१ टक्के पदे रिक्त आहेत. एकूण ९ पैकी ७ तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अतिरिक्त पदभारामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामांचा ताण वाढला आहे. रिक्त पदांमुळे जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांची अमंलबजावणी व्यवस्थित होत नसल्यामुळे शेतकरी तसेच शेतीच्या विकासाला खीळ बसली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत सर्व एक ते चार संवर्गातील मिळून एकूण ६४० पदे मंजूर आहेत. रिक्त पदांमध्ये परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम या सात ठिकाणच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

गंगाखेड आणि पूर्णा या दोन तालुक्यांसाठी पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी आहेत. गंगाखेड येथील तालुका कृषी अधिकारी जी. ए. कोरेवाड यांच्याकडे जिंतूर येथील, तर पूर्णा येथील तालुका कृषी अधिकारी आर. पी. देशपांडे यांच्याकडे सोनपेठ येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांचा अतिरिक्त पदभार आहे.

परभणी येथील तंत्र अधिकाऱ्यांकडे सेलू येथील तालुका कृषी अधिकारी पदांचा अतिरिक्त पदभार आहे, तर परभणी, मानवत, पाथरी, पालम येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांचा पदभार मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांच्याकडे आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तसेच उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त आहेत. कृषी अधिकाऱ्यांची ८ आणि मंडळ कृषी अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त आहेत. कृषी सहायकांची ६९ पदे, तसेच कृषी पर्यवेक्षकांची एकूण ८ पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांमध्ये वर्ग दोन संवर्गातील १०, वर्ग दोन कनिष्ठ संवर्गातील २०, वर्ग तीन संवर्गातील १३८ आणि वर्ग चार संवर्गातील २९ पदे मिळून एकूण १९७ पदांचा समावेश आहे. अतिरिक्त पदभार असलेल्या तालुका कृषी अधिकारी यांच्यापासून ते कृषी सहायकांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

कृषी विभागाच्या योजनांच्या व्यवस्थित अमंलबजवणीसाठी, तसेच त्या शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोचवण्यासाठी अनेक वर्षांपासून रिक्त असेलली पदे तत्काळ भरण्याची गरज आहे.

इतर बातम्या
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे विदर्भातील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
रिलायन्स विमा कंपनीला पीकविमाप्रकरणी...परभणी ः २०१७ च्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात...
वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे...अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील सहावे बक्षिस...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
अन्य सस्तनापेक्षा उंदराची विचार...दृष्टी किंवा दृश्यावर आधारीत समस्या सोडविण्यासाठी...
विठ्ठला या सरकारला सुबुध्दी दे !...पंढरपूर, जि. सोलापूर : कर्नाटक व केरळच्या धर्तीवर...
आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते...नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी...
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत...पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक...
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी...सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला...
हतनूर धरणाचे १० दरवाजे पूर्णपणे उघडलेजळगाव : भुसावळ व मुक्ताईनगरनजीकच्या तापी नदीवरील...
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध...जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी...
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरलेइगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी...
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाहीनाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने...
सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...