agriculture news in marathi, 31 sugar factories got crushing license, Maharashtra | Agrowon

नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर कारखान्यांना परवाने
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१ साखर कारखान्यांनी परवाने मिळवले आहेत. तसेच विनापरवाना एकाही साखर कारखान्याने गाळप सुरू केले नसल्याचे साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.  

राज्यात २०१८-१९ च्या गाळप हंगामासाठी २० ऑक्टोबरपासून परवाने वाटप सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिले होते. मात्र, ऊस दर नियंत्रण मंडळाच्या शेतकरी सदस्यांनी अलीकडे वार्ताहरांशी बोलताना काही कारखान्यांनी साखर आयुक्तांच्या परवानगीशिवाय सुरू केल्याची तक्रार केली होती. 

पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१ साखर कारखान्यांनी परवाने मिळवले आहेत. तसेच विनापरवाना एकाही साखर कारखान्याने गाळप सुरू केले नसल्याचे साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.  

राज्यात २०१८-१९ च्या गाळप हंगामासाठी २० ऑक्टोबरपासून परवाने वाटप सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिले होते. मात्र, ऊस दर नियंत्रण मंडळाच्या शेतकरी सदस्यांनी अलीकडे वार्ताहरांशी बोलताना काही कारखान्यांनी साखर आयुक्तांच्या परवानगीशिवाय सुरू केल्याची तक्रार केली होती. 

‘‘आयुक्तांच्या मान्यतेशिवाय कोणत्याही कारखान्याला गाळप सुरू करता येत नाही. परवाना घेण्यापूर्वीच गाळप सुरू केल्याच्या संशय व्यक्त केला गेला होता. तथापि, प्रादेशिक साखर सहसंचालकांनी स्वतः या कारखान्यांना भेटी दिल्या आहेत. एकाही कारखान्यांने मान्यतेविना गाळप चालू केलेले नाही. तसे अहवालदेखील प्रादेशिक कार्यालयातून प्राप्त झाले आहेत,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 
राज्यात यंदा किमान १०० सहकारी व ९० खासगी साखर कारखाने गाळपासाठी उतरण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत ३१ कारखान्यांनी गाळप परवाने घेतलेले आहेत. तसेच एकूण १९४ कारखान्यांनी प्रादेशिक सहसंचालकांकडे परवान्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. छाननीअंती १३८ प्रस्ताव साखर आयुक्तालयाला पाठविण्यात आलेले आहेत. ‘‘कायद्यानुसार शेतकऱ्यांना एफआरपी आणि आरएसएफनुसार पेमेंट न केलेल्या साखर कारखान्यांना परवाने देण्याचा सध्या तरी विचाराधीन नाही. सहसंचालकांच्या स्तरावर अजूनही ५६ कारखान्यांची माहिती तपासली जात आहे,’’ असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे. 

साखर उत्पादन अंदाज पाच लाखांनी घटला
राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत १०५ लाख टन साखर तयार होण्याचा अंदाज गेल्या महिन्यात व्यक्त करण्यात आला होता. तथापि, आता  दुष्काळी स्थितीचा आढावा घेता सुधारित अंदाजात यात पाच लाख टनाने घट गृहीत धरण्यात आलेली आहे. गेल्या हंगामात सहकारी व खासगी कारखान्यांना ९.०५ लाख हेक्टरवरील उसाचे गाळप केले. त्यापासून १०७ लाख टन साखर तयार झाली होती. यंदा ९० ते १०० लाख टन साखर तयार होईल, असे सुधारित अंदाजानुसार सांगितले जात आहे.

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...