agriculture news in marathi, 32 opposition parties with farmers says Raju Shetty | Agrowon

शेतकरी हिताच्या पाठीशी ३२ विरोधी पक्ष; १९३ शेतकरी संघटना
टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 मे 2018

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली जाणार आहे. या अधिवेशनात शेतकरी हिताची दोन विधेयके मांडली जाणार असून, या विधेयकांना देशभरातील ३२ विरोधी पक्षांसह १९३ शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली जाणार आहे. या अधिवेशनात शेतकरी हिताची दोन विधेयके मांडली जाणार असून, या विधेयकांना देशभरातील ३२ विरोधी पक्षांसह १९३ शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आता मरायचं नाही लढायचं म्हणत शेतकरी सन्मान अभियान राबविले जात आहे. राज्यातील १४ जिल्ह्यात राबविल्या जाणारे हे अभियान शुक्रवारी (ता. ४) औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी खासदार शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. शेट्टी म्हणाले, मे महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशन बोलविण्यासाठी येत्या १० मे रोजी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा हजार लोक आम्ही मागणी करीत असलेले अधिवेशन बोलवले जावे यासाठी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. या अधिवेशनात स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीवर अंमलबजावणीसह संपूर्ण कर्जमुक्‍ती व इतर आवश्‍यक विषयांची दोन बिले सादर केली जातील. या विधेयकांना ३२ विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राज्यसभेत कॉम्रेड राकेशजी व लोकसभेत आपण स्वत: ही विधेयके मांडणार आहोत. या विधेयकांच्या निमित्ताने नेमके शेतकऱ्यांच्या बाजूने कोण हे आपल्याला पहायचे आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...