agriculture news in marathi, 32 persons from Dapoli Agri University dies in bus accident, Maharashtra | Agrowon

दापोली कृषी विद्यापीठातील 32 जणांचा बस अपघातात मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

महाबळेश्वर : महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात बस कोसळून भीषण अपघात झाला. या घाटातील दाभीक टोक जवळील 800 मीटर पेक्षा जास्त खोल दरीत ही बस कोसळली. यातील सर्व कर्मचारी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील असून यामध्ये 31 कर्मचारी आणि दोन चालक असे एकूण 33 जण बसमध्ये होते. आतापर्यंत 26 जणांनाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या अपघाता केवळ एका कर्मचाऱ्याचा जिव वाचला असून 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शिवसेनेचे स्थानीक आमदार भरत गोगावले यांनी दिली. 

महाबळेश्वर : महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात बस कोसळून भीषण अपघात झाला. या घाटातील दाभीक टोक जवळील 800 मीटर पेक्षा जास्त खोल दरीत ही बस कोसळली. यातील सर्व कर्मचारी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील असून यामध्ये 31 कर्मचारी आणि दोन चालक असे एकूण 33 जण बसमध्ये होते. आतापर्यंत 26 जणांनाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या अपघाता केवळ एका कर्मचाऱ्याचा जिव वाचला असून 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शिवसेनेचे स्थानीक आमदार भरत गोगावले यांनी दिली. 

सकाळी 6.30 वाजता दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले होते. बस दरीत कोसळ्यानंतर यातील सावंत नावाचे कर्मचारी बसमधून बाहेर फेकले गेले. त्यांनी घाटातून वर येऊन या घटनेची माहिती विद्यापीठाला कळवली. त्यानंतर प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांचे बचाव पथक, ट्रेकर्स टीम दाखल झाली आहे. महाबळेश्वरला पाऊस आणि धुके असल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता. पावसामुळे खडकांवर शेवाळ तयार झाले आहे. यामुळे पाय घसरण्याची भिती असते. 

सकाळी 10 वाजताच्या दरम्यान विद्यापीठात या अपघाताविषयी फोन आला. अपघात झालेल्या बसमधील एक कर्मचारी दरीतून वर आला आणि त्याने फोन करून घटनेची माहिती दिली. दरवर्षी भात लवाणी झाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची दरवर्षी सहलीला जात असतात. यावर्षीही ही सहल निघाली होती. बसमध्ये सर्व पुरूष आहेत. आम्ही घटनास्थळाकडे निघालो आहोत. या व्यतिरिक्त आणखी माहिती आमच्या पर्यंत पोहचली नाही.
- संजय भावे, वरिष्ठ कृषी अधिकारी, कोकण विद्यापीठ

बघ्यांमुळे बचावकार्यात अडथळा
घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. दरीच्या चहूबाचून बघ्यांनी गर्दी केली आहे. चुकूण एखाद्याच्या पायाने काही दगड खाली सरकले तर बचाव पथाकाच्या जिवावर बेतू शकते. 

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...