agriculture news in marathi, 320 ecotourism centers will started with peoples contribution | Agrowon

लाेकसहभागातून ३२० निसर्ग पर्यटन केंद्रे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 मे 2018

पुणे  : लाेकसहभागातून राज्यात ३२० निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठीच्या पहिल्या टप्प्यातील १०६ जागांवर कामे सुरू करण्यात आली असून, पुढील पाच वर्षांसाठी १२० काेटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.
 

पुणे  : लाेकसहभागातून राज्यात ३२० निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठीच्या पहिल्या टप्प्यातील १०६ जागांवर कामे सुरू करण्यात आली असून, पुढील पाच वर्षांसाठी १२० काेटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.
 
या वेळी मंडळाचे सदस्य किशाेर किशाेर मिस्त्रीकाेटकर, अनुज खरे, जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे उपस्थित हाेते. लिमये म्हणाले, ‘‘सध्याच्या प्रसिद्ध निसर्ग पर्यटन केंद्रांवर माेठ्याप्रमाणावर गर्दी हाेत आहे. यामुळे स्थानिक परिस्थितीवर विपरीत परिणाम हाेत आहेत. याचा विचार करून राज्यात नवीन निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करण्यासाठी राज्य शासनाने २०१५ मध्ये स्वतंत्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली.

या मंडळाद्वारे वन विभागाच्या जमिनींवर निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करण्यात येत आहेत. ही केंद्रे विकसित करत असताना, स्थानिक परिस्थितीला काेणताही धाेका निर्माण हाेणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तर स्थानिकांना शाश्‍वत उत्पन्नाचा स्त्राेत या केंद्रांद्वारे उपलब्ध हाेणार आहे. स्थानिक वन संरक्षण समित्यांद्वारे ही केंद्र संचलित असणार आहे.’’

‘‘राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये ३२० केंद्रांसाठीच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. यामधील पहिल्या १०६ केंद्राचा पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा बनिवण्यात आला असून, यासाठी १२० काेटींची तरतूद करण्यात आली आहे. तर निसर्गाचा अनुभव शालेय विद्यार्थ्यांना देण्यासाठी यंदा निसर्गानुभव संकल्पेतून जानेवारी २०१९ मध्ये एकाच दिवशी ८० हजार विद्यार्थ्यांना निसर्गाची सहल घडविणार आहाेत. निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करत असताना पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधत गड, किल्ल्यांचादेखील विकास करणार आहे’’, असेही लिमये यांनी या वेळी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...