agriculture news in marathi, 32,000 grape plots registered in the country | Agrowon

देशात 32 हजारांवर द्राक्ष प्लॉटची नोंदणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

नाशिक : "अपेडा'च्या ग्रेपनेट प्रणालीनुसार निर्यातक्षम रेसिड्यू फ्री द्राक्षांसाठी कृषी विभागाकडे देशभरातील द्राक्ष उत्पादकांनी 32 हजार 134 प्लॉटची नोंदणी केली आहे. अपेडाच्या संकेतस्थळावर केलेल्या नोंदणीत सर्वाधिक म्हणजे 32हजार 10 प्लॉटची नोंद महाराष्ट्रातून, तर त्यानंतर आंध्र प्रदेशातून 68 व कर्नाटकातून 36 प्लॉटची नोंद झाली आहे.

नाशिक : "अपेडा'च्या ग्रेपनेट प्रणालीनुसार निर्यातक्षम रेसिड्यू फ्री द्राक्षांसाठी कृषी विभागाकडे देशभरातील द्राक्ष उत्पादकांनी 32 हजार 134 प्लॉटची नोंदणी केली आहे. अपेडाच्या संकेतस्थळावर केलेल्या नोंदणीत सर्वाधिक म्हणजे 32हजार 10 प्लॉटची नोंद महाराष्ट्रातून, तर त्यानंतर आंध्र प्रदेशातून 68 व कर्नाटकातून 36 प्लॉटची नोंद झाली आहे.

पाऊस, थंडी तसेच उत्पादनातील घट पाहता यंदा द्राक्ष नोंदणीची गती काहीशी धीमी आहे. मात्र तरीही आपल्याकडील निर्यातक्षम मालाची नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे रेसिड्यू फ्री उत्पादनाचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना मिळते. नोंदणीनंतर द्राक्षे निर्यात झाली नाही तरी स्थानिक बाजारात या प्रमाणपत्रामुळे आपले उत्पादन रासायनिक अवशेषमुक्त असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे जास्तीत जास्त द्राक्ष उत्पादकांनी ही नोंदणी करावी. 30 डिसेंबर 2017 ही नोंदणीची अंतिम मुदत आहे. अशी माहिती कृषी आयुक्तालयातील निर्यात विभागाचे अधिकारी गोविंद हांडे यांनी दिली.

महाराष्ट्रात सर्वाधिक नोंद नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. सोमवार (ता. 18) पर्यंत नाशिक जिल्ह्यातून 28,240 प्लॉटची नोंद झाली असून त्यानंतर सांगलीतून 1847 तर पुणे जिल्ह्यातून 949 प्लॉटची नोंद झाली आहे. नियमित शेतकऱ्यांच्या प्लॉट बरोबरच नव्याने निर्यात करु इच्छिणाऱ्या द्राक्ष उत्पादकांनीही नोंदणी केली आहे. 30 डिसेंबरपर्यंत 50 हजार प्लॉटची नोंदणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
 

राज्यातील जिल्हानिहाय प्लॉट नोंदणी
जिल्हा प्लॉट संख्या
नाशिक 28,240
सांगली 1847
पुणे 949
सातारा 404
नगर 278
उस्मानाबाद 126
लातूर 85
सोलापूर 78
धुळे 2
बीड 1

(सोमवार, ता. 18 अखेरची)

इतर अॅग्रो विशेष
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...
प्रतीक्षा संपली... आजपासून जालन्यात ॲ...जालना : सर्वांना उत्सुकता लागून असेलल्या सकाळ -ॲ...
मोसंबीवर मावा चिकटा वाढलाऔरंगाबाद  : मोसंबीवर मावा व चिकटाचा...
विमा योजनेत हवामान केंद्रांचा घोळजळगाव ः यंदा जाहीर झालेल्या फळ पीक विमा योजनेतही...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल १००० ते ३३००...राज्यातील बाजार समित्यांमध्ये मागील महिनाभरापासून...
मराठवाड्यातील दुष्काळावर ‘इस्राईल’ची...मुंबई ः अपुऱ्या आणि अनियमित पर्जन्यमानामुळे...
अल्पभूधारक दांपत्याची प्रेरणादायी शेतीकोकण म्हटलं की भात, आंबा, काजू, नारळ आदींनी...
कपाशीसाठी नाव कमावलेली अकोटची बाजारपेठअलीकडील काही वर्षांत अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार...
राज्यातील ३४ हजार गावे हागणदारीमुक्तमुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशात...
अडचणीत आठवते शेतीआर्थिक महासत्ता, सर्वसमावेशक विकास अशा गप्पा...
रास्त दर मिळू न देणे हे षड्‌यंत्रच इसेन्शियल कमोडिटी ॲक्‍टचे भाषांतर करताना आवश्‍यक...
सार्वजनिक हेतूसाठी संपादित ग्रामीण...मुंबई : सार्वजनिक हेतूसाठी राज्यात भूसंपादन...
राज्यात कृषी पदवीसाठी ‘सीईटी’लागूपुणे : वैद्यकीय, अभियांत्रिकीप्रमाणेच राज्यातील...
कृषी तंत्रनिकेतनचा नवा अभ्यासक्रम रखडलापुणे : राज्यातील कृषी तंत्रनिकेतनचा नवा...