agriculture news in marathi, 335 crore crop loan settlement in Nanded, Parbhani and Hingoli | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत ३३५ कोटी पीक कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गुरुवार (ता. २८) पर्यंत ६५ हजार २७१ शेतकऱ्यांना ३३५ कोटी ८० लाख २५ हजार रुपये पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. माफीच्या अपेक्षेने नूतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यात कर्जमाफी मिळालेल्या असंख्य शेतकऱ्यांनाही नवीन पीककर्ज देण्यास विलंब लावला जात आहे.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गुरुवार (ता. २८) पर्यंत ६५ हजार २७१ शेतकऱ्यांना ३३५ कोटी ८० लाख २५ हजार रुपये पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. माफीच्या अपेक्षेने नूतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यात कर्जमाफी मिळालेल्या असंख्य शेतकऱ्यांनाही नवीन पीककर्ज देण्यास विलंब लावला जात आहे.

नांदेड जिल्ह्यात १ हजार ६८३ कोटी ४७ लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. गुरुवार (ता. २८) पर्यंत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ८ हजार ८७१ शेतकऱ्यांना ९८ कोटी ६१ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ५ हजार ६८९ शेतकऱ्यांना ४२ कोटी ६ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने १९ हजार १७८ शेतकऱ्यांना ४५ कोटी १८ लाख रुपये पीककर्ज वाटप केले आहे. परभणी जिल्ह्यात १ हजार ४७० कोटी ४४ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांनी २ हजार ५०२ शेतकऱ्यांना २२ कोटी ३६ लाख रुपये, खासगी बॅंकांनी ७८६ शेतकऱ्यांना ११ कोटी ३९ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ४ हजार ७६० शेतकऱ्यांना ३९ कोटी ६ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने १३ हजार २४० शेतकऱ्यांना २४ कोटी ४९ लाख रुपये असे एकूण २१ हजार २८८ शेतकऱ्यांना ९७ कोटी ३० लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ६.६२ टक्के वाटप झाले आहे. यंदा १ हजार ७४७ शेतकऱ्यांनी १८ कोटी ७९ लाख रुपयांच्या कर्जाचे नूतनीकरण केले आहे. १९ हजार ५४१ शेतकऱ्यांना ७८ कोटी ५१ लाख रुपये नव्याने पीककर्ज देण्यात आले आहे.
हिंगोलीत ९५९ कोटी खरीप पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. व्यापारी बॅंकांनी २ हजार ५४२ शेतकऱ्यांना २६ कोटी ९ लाख ३७ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ४ हजार ४०९ शेतकऱ्यांना ४१ कोटी ५६ लाख ४७ हजार रुपये, जिल्हा बॅंकेने ५ हजार ८३६ शेतकऱ्यांना ११ कोटी ८ लाख ७८ हजार रुपये असे एकूण १० हजार २४५ शेतकऱ्यांना ५२ कोटी ६५ लाख २५ हजार रुपये (४.७० टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले. २ हजार ८५७ शेतकऱ्यांना २६ कोटी ८५ लाख ४४ हजार रुपये नवीन पीक कर्जवाटप करण्यात आले तर ७ हजार ३८९ शेतकऱ्यांनी २५ कोटी ८२ लाख रुपये कर्जाचे नूतनीकरण केले.

 

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...