agriculture news in marathi, 34 animals died in Antharvanpimpri | Agrowon

अंथरवणपिंप्रीत पाच दिवसांत ३४ जनावरे दगावली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

बीड : शहराच्या जवळ असलेल्या अंथरवणपिंप्री येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून येथील जनावरांना साथ रोगाची लागण झाल्याने ३४ च्या वर जनावरे दगावली आहेत. शेतकरी चिंताग्रस्त असताना पशुसंवर्धन विभागाने दुर्लक्ष केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. १०) पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटनाही घडली. दरम्यान, मोठ्या जनावरांना लाळ्या खुरकूत तर लहान जनावरांना थंडीमुळे निमोनिया झाला आहे. हा आजार घटसर्प आहे का, यासाठी रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. 

बीड : शहराच्या जवळ असलेल्या अंथरवणपिंप्री येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून येथील जनावरांना साथ रोगाची लागण झाल्याने ३४ च्या वर जनावरे दगावली आहेत. शेतकरी चिंताग्रस्त असताना पशुसंवर्धन विभागाने दुर्लक्ष केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. १०) पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटनाही घडली. दरम्यान, मोठ्या जनावरांना लाळ्या खुरकूत तर लहान जनावरांना थंडीमुळे निमोनिया झाला आहे. हा आजार घटसर्प आहे का, यासाठी रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. 

शेतीवर उदनिर्वाह असलेल्या परिसरातील अंथरवणपिंप्रीत चार हजारांच्या पुढे जनावरांची संख्या आहे. मागच्या सहा दिवसांपासून जनावरांच्या तोंडातून फेस येणे, घसा सुजणे अशी लक्षणे सुरू झाली. यानंतर म्हशी, शेळ्या, मेंढ्या अशी ३४ जनावरे दगावली आहेत. यामध्ये हनुमान प्रभाळे, मोहन प्रभाळे, बाबासाहेब प्रभाळे, भरत प्रभाळे, रामकिसन वाघमारे, दशरथ प्रभाळे, सुंदर शिंदे यांची जनावरे दगावली आहेत. मागच्या पाच दिवसांपासून जनावरे मरत असताना पशुसंवर्धन विभागाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शेतकरी हवालदिल आणि संतप्त झाले. यातूनच गुरुवारी अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढल्यानंतर गावात पशुसंवर्धन विभागाचे पथक पोचले आणि मग उपचार सुरु झाले आहेत. उशिरा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संतोष पालवेही गावात पोचले. 

लाळ्या खुरकूत, निमोनिया आणि घटसर्पाची शक्यता
गुरुवारी दुपारनंतर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे पथक गावात पोचले. मोठ्या जनावरांना लाळ्या खुरकूत रोग असून लहान जनावरांना थंडीमुळे निमोनिया झाल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. देवानंद खाडे यांनी सांगितले. जनावरांना घटसर्प आहे का, याची खात्री करण्यासाठी रक्त, लाळेचे नमुने प्रयोशाळेत तपासणीसाठी पाठविल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्षेत्रामुळे नाहीत उपचार
दरम्यान, अंथरवणपिंप्रीच्या नजीक म्हाळसजवळा येथे जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय उपचार केंद्र आहे. मात्र, अंथरवणपिंप्री हे गाव राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात येत असल्याने साथ सुरू झाल्यानंतरही येथे पशुसंवर्धन विभागाचे कोणी फिरकले नसल्याची तक्रार शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष सचिन कोटुळे यांनी केली. 

कानशिलात लावल्यानंतर गेले पथक
पाच दिवसांपासून जनावरे दगावत असतानाही उपचार मिळत नसल्याने हवालदिल शेतकरी गुरुवारी जिल्हा परिषदेत आले. या वेळी बीडला आले. या वेळी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या दालनात बसलेले होते. चार दिवसांपासून उपचार नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली. यानंतर मग यंत्रणा हालली आणि पथक गावात पोचले. 

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...