राजस्थानमध्ये दरवर्षी ३४ बिबट्यांचा मृत्यू

राजस्थानमध्ये दरवर्षी ३४ बिबट्यांचा मृत्यू
राजस्थानमध्ये दरवर्षी ३४ बिबट्यांचा मृत्यू

जयपूर : मानव-बिबट्या संघर्ष राजस्थानात तीव्र हाेत आहे. राजस्थानमध्ये दरवर्षी ३४ बिबट्यांचा मृत्यू हाेत अाहे. संघर्ष कमी करण्यासाठी झालना वनक्षेत्रात प्राेजेक्ट लेपर्ड प्रकल्प राबवित अाहे. येत्या २ महिन्यांत या प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण हाेईल, अशी माहिती राजस्थानचे वन आणि पर्यावरणमंत्री गजेंद्रसिंग खिमसार यांनी दिली.  मंत्री गजेंद्रसिंग खिमसार म्हणाले, ‘‘बिबट्यांची वाढती संख्या ही मानव बिबट्या संघर्षाचे मुख्य कारण बनले आहे. या संघर्षात ग्रामस्थांकडून स्वंरक्षणासाठी बिबट्यांवर हल्ला हाेत असून, यामध्ये बिबट्यांचा मृत्यू हाेत आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, यासाठी जयपूर येथील झालना वनक्षेत्रात ‘प्राेजेक्ट लेपर्ड’ प्रकल्प राबविणार आहाेत. या प्रकल्पांतर्गत बिबट्यासाठी संरक्षित क्षेत्र तयार करीत आहाेत. हे क्षेत्रासाठीच्या संरक्षक भिंतीचे काम येत्या दाेन महिन्यांमध्ये पूर्ण केली जाईल.’’  भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेकडील उपलब्ध आकडेवारीनुसार राजस्थान मध्ये दरवर्षी ३४ बिबट्यांचा मृत्यू हाेत अाहे. तर जानेवारी २०१२ ते मे २०१८ या सहा वर्षांत २३८ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नाेंद आहे. बिबट्यांचा मृत्यू हाेण्याच्या घटनांमध्ये ८४ बिबट्यांचा मृत्यू रस्ते आणि रेल्वे अपघातात झाला असून, ५२ बिबट्यांचा मृत्यू नैर्सगिक किंवा अनैर्सगिक आहे. तर ३१ मृत्यूूची कारणे अस्पष्ट असून, २४ बिबट्यांची शिकार झाली असून, मानव बिबट्या संघर्षातील मानवाकडून झालेल्या हल्ल्यात १९ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच विद्युत चुंबकीय तारांच्या स्पर्शामुळे १४, तर बचाव माेहिमेदरम्यान ७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. या वर्षी २१ मेअखेर २३ बिबट्यांच्या मृत्यूंची नाेंद झाली असून, ११ मृत अवस्थेत सापडले असून, १२ बिबट्यांची शिकार झाली आहे. तर गेल्या दाेन वर्षांतील वन्यजीव गणनेनुसार २०१५ मध्ये ४३४ एवढी असणारी बिबट्यांची संख्या २०१६ मध्ये ५०८ एवढी झाली आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार वन्यप्राण्यांमध्ये नैर्सगिक शिकार करण्याचे प्रमाण कमी झाले असून, पाळीव प्राण्यांच्या शिकारीसाठी बिबटे मानव वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढत आहे. याबाबत बाेलतान पीपल फॉर ॲनिमल (पीएफए)चे प्रदेशाध्यक्ष बाबू लाल म्हणाले, ‘‘बिबट्यांचे हल्ले राेखण्यासाठी वन विभागाकडून ठाेस उपाययाेजना केल्या जात नाही. वनक्षेत्रात पाणी आणि भक्ष्याची साेय केल्यास बिबटे मानव वस्तीकडे येणार नाहीत. जंगलामध्ये पाणी आणि भक्ष्य मिळत नसल्याने बिबटे पाणी आणि भक्ष्याच्या शाेधार्थ शेतीकडे येत असून, पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत              आहेेत.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com