agriculture news in marathi, 34 thousand villages completes 100 percent of toilets | Agrowon

राज्यातील ३४ हजार गावे हागणदारीमुक्त
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशात गेल्या तीन वर्षांत पाच कोटींहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षात ५० लाख ८ हजार ६०१ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे, तर राज्यातील १६ जिल्हे व ३४ हजार गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशात गेल्या तीन वर्षांत पाच कोटींहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षात ५० लाख ८ हजार ६०१ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे, तर राज्यातील १६ जिल्हे व ३४ हजार गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत झालेल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार २०१५-१६ या वर्षात ६०५३ गावे राज्यात हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आली होती. ही संख्या २०१६-१७ मध्ये २१ हजार ७०२ इतकी झाली. आजअखेर महाराष्ट्रातील ३४ हजार १५७ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. राज्यातील गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, जालना, बीड, नगर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर व रायगड हे जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांत उल्लेखनीय कार्य
ग्रामीण महाराष्ट्रात घरगुती शौचालय निर्मितीमध्ये उल्लेखनीय काम झाले आहे. राज्यातल्या ३० जिल्ह्यांतील ग्रामीण भागात १०० टक्के शौचालय उभारणी झाली आहे. नंदुरबार, जळगाव, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा व गडचिरोली या सहा जिल्ह्यांत घरगुती शौचालय उभारणीचे काम ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. लवकरच या जिल्ह्यांतील घरगुती शौचालय उभारणीचे काम पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्राचा स्वच्छता आलेख
गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात ५० लाख ८ हजार ६०१ घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. २०१४- १५ या वर्षात राज्यात ४ लाख ३१ हजार ३४ शौचालये बांधण्यात आली. २०१५-१६ या वर्षात ८ लाख ८२ हजार ८८, सन २०१६-१७ या वर्षात १९ लाख १७ हजार १९१ तर २०१७-१८ या वर्षात १७ लाख ७८ हजार २८८ शौचालये बांधण्यात आली आहेत. २०१५-१६ मध्ये महाराष्ट्रातील १४.९४ टक्के गावे हागणदारीमुक्त होती. आता ८४.३० टक्के गावे हागणदारीमुक्त झाली आहेत.

   देशात तीन लाख गावे हागणदारीमुक्त  
२ ऑक्टोबर २०१४ रोजी देशातल्या ग्रामीण भागात ३८.७० टक्के घरगुती शौचालये होती, १४ जानेवारी २०१८ अखेर ही टक्केवारी ७६.२६ टक्क्यांवर पोचली आहे. आजअखेर देशात ५ कोटी ९४ लाख ४५ हजार शौचालयांची निर्मिती झाली आहे, तर देशातील ३ लाख ९ हजार १६१ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. देशातील ३०३ जिल्हे हागणदारीमुक्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांचा समावेश आहे.

इतर ग्रामविकास
दुग्ध व्यवसायातून डौलापूरने उंचावला...दर आणि बाजारपेठ यांचा अभाव असल्याने कधीकाळी दुग्ध...
युवकांनी घेतली ग्राम विकासाची जबाबदारीशेतकरी, शेतमजुरांच्या मुलामुलींना शालेय जीवनातच...
गिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...
शिक्षण, शेती अन ग्रामविकासात संस्कृती...नांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) सारख्या...
ग्रामपंचायत स्तरावरील कामे मुदतीत पूर्ण... ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कामे दिलेल्या...
हस्ता गावाने एकजुटीने पकडला विकासाचा...अौरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील हस्ता...
‘डोणूआई’ शेतकरी गट : एकीतून प्रगतीकडेपुणे जिल्ह्यातील डोणे येथे वीस शेतकऱ्यांनी डोणूआई...
वेंगुर्ला तालुक्यातील गावांनी जपलाय...सह्याद्रीच्या कडेकपारीत शेकडो वैशिष्ट्यपूर्ण व...
सामूहिक शक्तीमुळेच बल्लाळवाडी झाले...सर्व घटकांनी एकत्र आले, तर गावाचा निश्चितच...
शिक्षण, ग्रामोद्योगाला दिली चालनाआत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मायेची ऊब आणि...
सौरऊर्जेद्वारे चार हजार गावांना शाश्वत...ग्रामीण भागात लोडशेडींगच्या काळात नागरिकांना...
दुग्धव्यवसायाच्या आधारे अजनी सहकारातून...दुग्धव्यवसायाचा आधार घेत सहकारातून समृद्धीकडे...
यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून...कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या कवठेगावाने शेती,...
‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...
पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणातून उजळणार...शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेणे,...
लोकसहभागातून दिली ग्रामविकासाला दिशाऔरंगाबादमधील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज...
डोंगरसोनी झाले १२६ शेततळ्यांचे गावशासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोचली...
ग्रामपंचायतींमध्ये येणार ई-ग्रामसॉफ्ट...जिल्हाभरातील १,१५१ ग्रामपंचायतींमध्ये पुढचा...
निर्धार, इच्छाशक्ती, एकीतून निढळने...एकेकाळी दुष्काळ पाचवीला पुजलेले गाव अशी निढळची (...
महिला सक्षमीकरण, शाश्वत शेतीसाठी झटणारी...सातारा जिल्ह्यातील ॲवॉर्ड संस्था शाश्वत शेती...