agriculture news in marathi, 340 crores draft plan approved in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्याचा सुमारे ३४० कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जानेवारी 2019

सोलापूर : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१९-२० साठी ३३९ कोटी ७७ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी (ता.११) मंजुरी देण्यात आली. सन २०१८-१९ मध्ये मंजूर असलेल्या कामावरील निधी पूर्णपणे खर्ची करावा, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिल्या.

सोलापूर : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१९-२० साठी ३३९ कोटी ७७ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी (ता.११) मंजुरी देण्यात आली. सन २०१८-१९ मध्ये मंजूर असलेल्या कामावरील निधी पूर्णपणे खर्ची करावा, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिल्या.

देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार गणपतराव देशमुख, भारत भालके, बबनराव शिंदे, नारायण पाटील, दत्तात्रय सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा नियेाजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, ‘‘सन २०१८-१९ मध्ये विविध यंत्रणांनी ३१ डिसेंबर २०१८ अखेर १५६ कोटी ५५ लाख ४८ हजार इतका निधी विविध योजनांवर खर्च केला. खर्चाची टक्केवारी ७३.६३ टक्के इतकी आहे. यंत्रणांनी उर्वरित निधी आचारसंहितेपूर्वी खर्च करण्याचे नियोजन करावे.’’

सन २०१८-१९ मध्ये अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत यंत्रणांनी ६५ कोटी ९९ लाख ५५ हजार इतका निधी खर्च केला. खर्चाची टक्केवारी ८८.८० इतकी आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत १ कोटी ४५ लाख ८६ हजार खर्च, त्याची टक्केवारी ४७.६९ इतकी आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. 

सन २०१९-२० जिल्हा वार्षिक योजनेतून गाभा क्षेत्रासाठी २१७ कोटी ८० लाख ,बिगर गाभा क्षेत्रासाठी १०४ कोटी ९८ लाख १३ हजार  आणि नावीन्यपूर्ण योजना, राज्य नावीन्यता परिषद, जिल्हा नावीन्यता परिषद व मूल्यमापन, डाटा एन्ट्री, सनियंत्रण आदीसाठी १६ कोटी ९८ लाख ८७ हजार रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पुनर्विनियोजनामधील निधी तीर्थक्षेत्र विकास, जनसुविघा व अन्य आवश्यक विकास कामांकडे वर्ग करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील दुष्काळ पाहता पाणीपुरवठ्यास आवश्यक निधीची तरतूद करण्याबाबतही बैठकीत विचारविनिमय झाला. तातडीने दुरुस्त होण्यासारख्या योजना सुरू करून पाणीपुरवठा केला जाईल, असेही ते म्हणाले.

नियोजन भवनाचे उद्‍घाटन
जिल्हा प्रशासनामार्फत शासकीय दूध डेअरी शेजारी नवीन नियोजन भवन बांधण्यात आले आहे. त्याचे उद्‍घाटन पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

चारा डेपोबाबत लवकरच कार्यवाही
जिल्ह्यात पिण्याचे पाणी, रोजगार हमीची कामे आणि जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. ज्या गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव प्राप्त होतील, त्या गावची पाहाणी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी करुन त्वरित टँकर उपलब्ध करून द्यावा. जनावरांच्या चाऱ्यासंदर्भात चारा डेपोबाबत लवकरच निर्णय होऊन त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...