पंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदी

पंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदी
पंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदी

चंडिगड : पंजाब राज्यात बुधवार (ता.१८) पर्यंत ३४.९२ लाख मेट्रिक टन गव्हाची शासकीय खरेदी झाली आहे. रब्बी हंगामातील गहू खरेदीचे आत्तापर्यंतचे लक्ष पंजाब सरकारने गाठले आहे. शासकीय खरेदीत राज्य सरकारकडून विशेष खरबदारी घेण्यात येत असून, मुख्यमंत्र्यांसह सर्व खरेदी संस्थांचे प्रमुख जातीने लक्ष देत आहेत.  पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सूचनांनुसार राज्यातील शासकीय खरेदी संस्थांचे प्रमुख, व्यवस्थापकीय संचालक व्यक्तीगत राज्यातील सर्व बाजारसमित्यांत सुरू असलेल्या खरेदीवर लक्ष ठेऊन आहेत, यामुळे कोठेही शासकीय खरेदी प्रक्रिया मंदावलेली नसल्याचे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले. खरेदी प्रक्रियेत कोणतीही समस्या उद्‌भवल्यास खरेदी संस्थांचे प्रमुख अथवा व्यवस्थापकीय संचालक विनाविलंब त्याचे निराकारण करतात. यासंदर्भातील कोणतीही ढिलाई सहन न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या या गव्हाचे पेमेंटही निर्धारित कालावधीत पूर्ण केले जात आहे. १८ एप्रिलपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना १८८५.३० कोटी रुपये परतावा देण्यात अाल्याचे प्रवक्त्याने सांगितले. सध्या गहू खरेदीला सर्वोच्च प्राधान्य राज्य सरकारने दिले आहे. राज्यातील सर्व संस्थांना याकरिता चालना देण्यात आली असून  १३० लाख टन गहू खरेदीचे यंदाचे लक्ष असणार आहे. शेतकऱ्यांना लांबचा प्रवास करावा लागू नये म्हणून राज्यातील १८३६ बाजार समित्यांत (मंडी) खरेदी केली जात आहे.  नव्या आवकेला जागा उपलब्ध व्हावी म्हणून आलेल्या मालाची तत्काळ एफसीआयसह इतर खरेदी संस्थांच्या गोदामांमध्ये रवानगी केली जात आहे. माल वाहतुकीसाठी एप्रिल आणि मे २०१८ या दोन महिन्यांकरिता सुमारे ४०० विशेष रेल्वेचे नियोजन भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय)ने केले आहे.  केंद्र सरकार आणि भारतीय अन्न महामंडळाच्या निर्देशांनुसार राज्य सरकारकडून विविध खरेदी संस्थांवर पडणाऱ्या बोजांचे ओझे कमी करण्यासाठी पाऊले उचलत आहेत. गेल्यावर्षीच्या दरापेक्षा अधिक ३०० ते ४०० रुपये परताव्यासह गहू वाहतुकीकरिता मूळदराच्या तुलनेत यंदा १२० टक्के अधिकचे टेंडर देण्यात आले अाहे. काही ठिकाणी झालेल्या हलक्या पावसाने अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी, तत्काळ सोडविण्यात आल्याचे प्रवक्त्याने सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com