साताऱ्यात ३५ लाख टन उसाचे गाळप

जिल्ह्यातील १४ साखर कारखान्याचे गाळप हंगामास गती आली आहे. माजगाव ( जि. सातारा) येथे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊसाची भरणी करताना ऊस मजूर. ( छायाचित्र : विकास जाधव)
जिल्ह्यातील १४ साखर कारखान्याचे गाळप हंगामास गती आली आहे. माजगाव ( जि. सातारा) येथे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊसाची भरणी करताना ऊस मजूर. ( छायाचित्र : विकास जाधव)

सातारा  ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस गाळप सुरू झाला आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ३४ लाख ९७ हजार २१९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ३८ लाख ४० हजार १०५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले असले काही कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केलेली नाही.

जिल्ह्यात आठ सहकारी व सहा खासगी अशा एकूण १४ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. जिल्ह्यात ३४ लाख ९७ हजार २१९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ३८ लाख ४० हजार १०५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गाळपात सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक चार लाख ९४ हजार ८०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, पाच लाख ८९ हजार २२० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.साखर उताऱ्यामध्ये सह्याद्री कारखान्याची आघाडी असून, या कारखान्याचा सरासरी उतारा ११.९१ टक्के आहे.

सह्याद्रीसह श्रीराम, कृष्णा, अजिंक्‍यतारा, जयवंत शुगर, ग्रीन पॉवर या कारखान्यांचा सरासरी उतारा ११ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त येत आहे. उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी बहुतांशी कारखान्याने कार्यक्षेत्राच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात ऊस आणत आहेत. ऊस तोडणी मजुरांची अडचण भासत असल्यामुळे केन हार्वेस्टरद्वारे ऊस तोडण केली जात आहे. अनेक कारखान्यांकडून केन हार्वेस्टरची खरेदी करण्यात आली आहे.

लागणीचा ऊस किंवा पडलेला ऊस असेल तर या मशिनने नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे खोडवा, रडवा किंवा ऊस काढणार असले तर ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर करू दिला जात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com