agriculture news in marathi, 35 million of the Ruffle , not recieved | Agrowon

हमीभावाने विकलेल्या हरभऱ्याचे ३५ कोटी मिळेनात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

सोलापूर  : राज्य शासनाने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रांत शेतकऱ्यांनी चार हजार ४०० रुपयांप्रमाणे हरभरा विकला. एक मार्चपासून अद्यापही शेतकऱ्यांना दमडाही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून खरिपाच्या मशागतीसाठी सावकाराचे दार ठोठावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

मागील गाळप हंगामात साखर कारखान्यांना ऊस घातला. परंतु, काही कारखान्यांकडून आणखी शेतकऱ्यांना एफआरपीदेखील मिळालेली नाही. त्यानंतर हरभरा हमीभावाने विक्री करण्याकरिता नोंदणी केली, परंतु मुदत संपल्याने तो हमीभावापेक्षा कमी किमतीने विकावा लागत आहे.

सोलापूर  : राज्य शासनाने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रांत शेतकऱ्यांनी चार हजार ४०० रुपयांप्रमाणे हरभरा विकला. एक मार्चपासून अद्यापही शेतकऱ्यांना दमडाही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून खरिपाच्या मशागतीसाठी सावकाराचे दार ठोठावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

मागील गाळप हंगामात साखर कारखान्यांना ऊस घातला. परंतु, काही कारखान्यांकडून आणखी शेतकऱ्यांना एफआरपीदेखील मिळालेली नाही. त्यानंतर हरभरा हमीभावाने विक्री करण्याकरिता नोंदणी केली, परंतु मुदत संपल्याने तो हमीभावापेक्षा कमी किमतीने विकावा लागत आहे.

तुरीचेही पैसे काहींना मिळालेले नाहीत. अशी परिस्थिती असतानाच हरभऱ्याची तरी रक्‍कम लवकर मिळेल आणि खरीप हंगामाची मशागत करून बियाणे व खते घेऊ, असे नियोजन शेतकऱ्यांनी केले. मात्र, मागील साडेतीन महिन्यांपासून हरभऱ्याचा एक पैसाही मिळालेला नाही. सरकारकडूनच पैसे मिळत नाहीत तर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर हमीभावाचे पैसे तत्काळ द्या नाहीतर आत्महत्या करू, असा इशारा दिला आहे.

पाठपुरावा सुरू

``हरभऱ्यासाठी पहिल्या टप्प्यात नाफेडकडून राज्यासाठी ११९ कोटी रुपये मिळाले. परंतु, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला एक रुपयाही मिळाला नाही. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून रक्‍कम कधी मिळेल, हे निश्‍चित सांगता येणार नाही.``

- दिलीप पाटील, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...