नगरमध्ये खरिपासाठी ३५ हजार क्विटंल बियाणे उपलब्ध

नगरमध्ये खरिपासाठी ३५ हजार क्विटंल बियाणे उपलब्ध
नगरमध्ये खरिपासाठी ३५ हजार क्विटंल बियाणे उपलब्ध

नगर ः खरिपासाठी नगर जिल्ह्यामध्ये ३४ हजार ९८९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाली आहेत. त्यात १७ हजार ४०८ सार्वजनिक तर १७ हजार ५८१ क्विंटल खासगी बियाणे आहेत. मागील तीन वर्षांची सरासरी ग्रहीत धरून यंदा ६२ हजार ५७६ क्विंटल बियाणाची मागणी केलेली आहे. पावसात खंड पडल्यामुळे अजून बियाणे खरेदी नाही. नगर जिल्ह्यामध्ये खरिपात भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मगू, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस ही पिके प्राधान्याने घेतली जातात. जिल्ह्यामध्ये यावर्षी चार लाख ८० हजार ५५० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार नियोजन केले जात आहे. यंदाच्या खरिपासाठी कृषी विभागाने ६२ हजार ५७६ क्विंटल बियाणाची मागणी केलेली आहे. त्यात आतापर्यंत १७ हजार ४०८ सार्वजनिक तर १७ हजार ५८१ क्विंटल खासगी बियाणे उपलब्ध झाले आहे. मागील तीन वर्षांत २०१५ला ३१ हजार १३८, २०१६ ला ५५०८१ आणि गेल्यावर्षी २०१७ ला ४४१८० क्विंटल बियाणांची विक्री झाली होता. त्यानुसार मागील तीन वर्षांत बियाणांची केलेली मागणी आणि विक्री याची सरासरी काढून बियाणांची मागणी केलेली असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. जिल्ह्यामध्ये पावसात खंड पडला असल्याने अजून बियाणे खरेदी होत नाही.

आतापर्यंत पीक निहाय बियाणे उपलब्धता (क्विंटलमध्ये)

भात २३३२ मका ४१४२ उडीद २९७१ सूर्यफूल
ज्वारी २२ तूर ६९८ भुईमूग सोयाबीन १८८७०
बाजरी ३८२१ मूग ६६२ तीळ कापूस १४७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com