agriculture news in marathi, 3500 quintal tur procured in five days | Agrowon

पाच दिवसांत साडेतीन हजार क्विंटल तूर खरेदी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मुंबई : राज्यात १ फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरवात झाली आहे. सोमवारअखेरपर्यंत १६० तूर केंद्रांवर ३३९ शेतकऱ्यांची ३,७५५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

मुंबई : राज्यात १ फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरवात झाली आहे. सोमवारअखेरपर्यंत १६० तूर केंद्रांवर ३३९ शेतकऱ्यांची ३,७५५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
तूर खरेदी केंद्रावर सुमारे १ लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तूर खरेदी तीन महिने चालणार असून, सोमवारचा पाचवा दिवस होता. तूर खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असून, तूर खरेदीसाठी उपलब्ध खरेदी केंद्रांशिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

तूर खरेदीसाठी शेतकरी नोंदणी आवश्यक असून, त्यासाठी एनईएलएम (NELM) पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर अथवा बाजार समिती आवारात जावे लागू नये, यासाठी मंडळ स्तरावर अथवा मोठ्या गावामध्ये तुरीची नोंदणी करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. नोंदणीच्या वेळी शेतकऱ्यांनी आधार कार्डची छायाकिंत प्रत, सुरू असलेल्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, अथवा त्या खात्याचा रद्द केलेला धनादेश (चेक), सातबारा उतारा आदी कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना खरेदीचे चुकारे ऑनलाइन त्यांच्या बँक खात्यांत जमा होणार असल्यामुळे बँक खात्याची नोंदणी अचूक करावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे.

इतर बातम्या
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
‘लॅव्हेंडर’च्या सुगंधाचे जनुकीय...कॅनगन येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्रो....
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
साताऱ्यात मेथी, कोथिंबिरीला प्रतिशेकडा...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी...सोलापूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाईवर मात...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
मराठवाड्यातील लघू, मध्यम प्रकल्पांतील...औरंगाबाद  : दुष्काळाच्या उंबरठ्यावरील...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
शास्वत उत्पन्नासाठी रेशीम उद्योग समजून...औरंगाबाद : शाश्वत उत्पादन व उत्पन्नासाठी नव्याने...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...