agriculture news in marathi, 3577 villages below Paisewari in marathwada | Agrowon

मराठवाड्यात ४२ टक्के गावांची पैसेवारी कमी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जानेवारी 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील साडेतीन हजारांवर (४२ टक्के) गावातील खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैशाच्या आत आली आहे. यामध्ये औरंगाबाद व परभणी जिल्ह्यांतील सर्वच्या सर्व तर जालना, नांदेड व लातूर जिल्ह्यातील १३७४ गावांचा समावेश आहे. त्यामुळे आता प्राप्त परिस्थितीवर शासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील साडेतीन हजारांवर (४२ टक्के) गावातील खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैशाच्या आत आली आहे. यामध्ये औरंगाबाद व परभणी जिल्ह्यांतील सर्वच्या सर्व तर जालना, नांदेड व लातूर जिल्ह्यातील १३७४ गावांचा समावेश आहे. त्यामुळे आता प्राप्त परिस्थितीवर शासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मराठवाड्यातील ८५२५ गावांची खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड व लातूर या जिल्ह्यांतील ३५७७ गावांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १३५४, जालना जिल्ह्यातील ३५, परभणी जिल्ह्यातील ८४९, नांदेड जिल्ह्यातील ११६८, लातूर जिल्ह्यातील १७१ गावांची खरिपाची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी आली आहे.

महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत लागवडीखालील एकूण ५६ लाख ५१ हजार ७६१ हेक्‍टर क्षेत्रापैकी खरिपात ५० लाख ९६ हजार ३३६ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. ४ लाख ३८ हजार ९११ हेक्‍टर क्षेत्र यंदाच्या खरीपात पडिक होते. जालना जिल्ह्यातील जालना तालुक्‍यातील ३५ गावात खरिपात कमी पाउस तसेच पावसाचा खंड पडल्याने पिकाची उगवण आणि वाढ न झाल्याने त्या गावांमधील सुधारित पैसेवारी ५० पैशाच्या आत जाहीर करण्यात आली. 

पैसेवारीचा थेट संबंध महसुलाची माफी किंवा स्थगितीशी येतो. त्यानंतर प्राप्त परिस्थितीनुसार दुष्काळ घोषीत करणे, त्याअनुषंगाने दुष्काळी उपाययोजना लागू करणे अपेक्षित असते. परतीच्या पावसाने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील काही प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा झाला असला तरी बहूतांश लघू, मध्यम प्रकल्पांची अवस्था बिकट आहे. पाणी साठलेल्या प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. संख्येने सर्वाधिक असलेल्या मराठवाड्यातील लघू प्रकल्पांमध्ये ३९ टक्‍क्‍यांच्या आत असलेला उपयुक्‍त पाणीसाठा मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची स्थिती दर्शविण्यास पुरेसा आहे. दुष्काळ जाहीर झाल्यास पिण्याचे पाणी, गुरांचा चारा, रोजगार निर्मीती करून हाताला काम देणे आदी बाबी राबविण्यावर प्राधान्याने जोर दिला जातो. त्याचबरोबर युद्धपातळीवर जलसंधारणाची कामे या निमित्ताने प्राधान्याने होणे अपेक्षीत असते. त्यामुळे महसूल विभागाकडून डिसेंबरच्या मध्यान्हात प्राप्त अंतिम पैसेवारीनंतर आता शासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

तालुकानिहाय ५० पैशाच्या आत अंतिम पैसेवारी (पैशात)
औरंगाबाद जिल्हा : औरंगाबाद ४६, पैठण ४७, फुलंब्री ४२, वैजापूर ४७.३६, गंगापूर ४७, खुलताबाद ४५.७८, सिल्लोड ४७, कन्नड ४७.६०, सोयगाव ४५

परभणी जिल्हा
परभणी ४१.१८, गंगाखेड ३९, पूर्णा ३८.०७, पालम ४१, पाथरी ४४.३८, सोनपेठ ४५,
मानवत ४७.७७, सेलू ४९, जिंतूर ४७.६७

नांदेड जिल्हा
कंधार ४६, लोहा ४६, हदगाव ४७, हिमायत नगर ४७, किनवट ४८, माहूर ४७, देगलूर ४८, मुखेड ४४, बिलोली ४८, नायगाव ४६

लातूर जिल्हा
जळकोट........ ४४.३६
अहमदपूर....... ४७.४७

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...