agriculture news in Marathi, 37 lac quintal agri produce sell on e-nam, Maharashtra | Agrowon

ई-नामद्वारे ३७ लाख क्विंंटल शेतमालाचा ऑनलाईन लिलाव
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे ः बाजार समित्यांमधून शेतमालाच्या आॅनलाईन लिलावासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या आॅनलाईन राष्‍ट्रीय ॲग्रीकल्चर मार्केट (ई-नाम) अंतर्गत राज्यात सुमारे १ हजार कोटींच्या ३७ लाख क्विंटल शेतमालाचा आॅनलाईन लिलाव झाला, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

पुणे ः बाजार समित्यांमधून शेतमालाच्या आॅनलाईन लिलावासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या आॅनलाईन राष्‍ट्रीय ॲग्रीकल्चर मार्केट (ई-नाम) अंतर्गत राज्यात सुमारे १ हजार कोटींच्या ३७ लाख क्विंटल शेतमालाचा आॅनलाईन लिलाव झाला, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

राज्यात सध्या ६० बाजार समित्यांमध्ये ई-नाम प्रणाली कार्यान्वीत आहे. श्री. पवार म्हणाले, की राज्यात केंद्र शासन पुरस्कृत दोन टप्प्यांमध्ये ६० बाजार समित्यांचा समावेश ई-नाम मध्ये करण्यात आला आहे. ई-नामसाठीच्या तांत्रिक पायाभूत सुविधांसाठी प्रत्येक बाजार समितीला केंद्र शासनाकडून ३० लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला असून, टप्प्याटप्प्याने विविध बाजार समित्यांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

जानेवारीअखेर ५५ बाजार समित्यांमध्ये ई-लिलाव सुरू झाले असून, ३७ लाख क्विंटल अन्नधान्याचा आॅनलाईन लिलाव झाला आहे. या माध्यमातून सुमारे १ हजार कोटींची उलाढाल झाली असून, शेतकऱ्यांना हे पैसे आॅनलाईन पद्धतीने देण्यात आले आहेत. शेतमालाच्या गुणवत्तेच्या पृथ्थकरणासाठी प्रत्येक बाजार समितीमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून, ४७ प्रयोगशाळा कार्यान्वत झाल्या आहेत.

१४५ बाजार समित्यांत राज्य ‘ई-नाम’ करणार
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील १४५ बाजार समित्यांमध्ये ई-नाम प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठीचा प्रत्येक बाजार समितीसाठीचा ३० लाखांचा निधी जागतिक बॅंकेच्या स्मार्ट प्रकल्पाद्वारे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सुनील पवार यांनी सांगितले.  

टप्पा १ ः सप्टेंबर २०१७ पासून

 •    ३० बाजार समित्यांमध्ये आॅनलाईन लिलाव सुरू. 
 •    ३४.४४ लाख क्विंटल शेतमालाचा आॅनलाईन लिलाव.
 •    लिलावाचे ९८० कोटी रुपये आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना अदा. 
 •    शेतमालाची गुणवत्ता तपासणीसाठी ३० बाजार समित्यांमध्ये असेईंग लॅब कार्यान्वित.
 •    ३० बाजार समित्यांमध्ये असेईंग सुरू, एकूण १,२८,७६८ लॉटस्चे असेईंग.
 •    २८ बाजार समित्यांमध्ये ई-पेमेंट सुरू, ३० कोटी ३७ लाख रुपये वितरीत
 •    शेतकरी नोंदणी ः ५,५५,४४४
 •    खरेदीदार (व्यापारी) नोंदणी ः ७,५२१
 •    आडते नोंदणी ः ६,८३९

टप्पा २ ः एप्रिल २०१८ पासून

 •    ३० बाजार समित्यांमध्ये शेतमालाची गेट एन्ट्री सुरू.
 •    २५ बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात ई-ऑक्शन सुरू. 
 •    ३.६६ लाख क्विंटलच्या शेतमाल लिलावातून शेतकऱ्यांना १०४ कोटी वितरीत. 
 •    शेतमालाची गुणवत्ता तपासणीसाठी ३० बाजार समित्यांमध्ये असेईंग लॅब सुरू.
 •    १७ समित्यांनी असेईंग सुरू केले आहे. एकूण ३०१२ लॉटस्चे असेईंग.
 •    तकरी नोंदणी ः ३ लाख ६० हजार २९
 •    खरेदीदार नोंदणी ः ६  हजार ६३६
 •    आडते नोंदणी ः ४ हजार ७३१

प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वाधिक ग्रामसभा
ई-नामच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसभांमधून जनजागृती करण्याचे आदेश केंद्र शासनाने बाजार समित्यांना दिले होते. त्यानुसार ६० बाजार समित्यांनी १ हजार ८१ ग्रामसभांचे आयोजन केले होते. यामध्ये ६५ हजार ८८३ शेतकरी सहभागी झाले होते. ग्रामसभांची संख्येचा राज्याने देशामध्ये प्रथम क्रमांक असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले. 

इतर बातम्या
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज...नांदेड : लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
‘महाबीज’तर्फे बीजोत्पादनासाठी आगाऊ...जळगाव : आगामी खरिपासाठी सोयाबीन, उडीद, मूग, ताग,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकटनाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
पेमेंट न मिळाल्याने वसाकाच्या ऊस...नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...